Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २१ जून, २०२६

*मागील भांडणाचा राग धरून व टपरी काढण्याच्या कारणावरून सवतगाव माळीनगर येथे आईसह मुलीस मारहाण अकलूज पोलिसात एनसीआर दाखल गुन्हा घडवून २२ दिवस झाले अद्याप न्याय मिळाला नाही!*

 *माळीनगर --प्रतिनिधी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


मागील भांडणाचा राग धरून व टपरी काढण्याच्या कारणावरून सवतगाव (माळीनगर) येथे एका महिलेसह तिच्या मुलीला जबर मारहाण करण्यात आली असल्याची फिर्याद अकलूज पोलिसात दाखल झाली आहे याबाबत पोलीस एनसीआर नुसार मिळालेली माहिती अशी की

1) किंयादी रेश्मा एजाज शेख वय 42 वर्षे, रा. सिंध्याथनगर सवतगाव ता. माळशिरस मो नं 70664482072) आरोपी 1) राजु हिरालाल माने 2) आण्णा श्रीमंत माने 3) रामा साबळे 4) संजय हिरालाल माने सर्व रा सिध्दाथनगर सवतगाव, ता. माळशिरस 3) मु.ध.ता.वे. ठिदि. 31/05/2026 रोजी 10/30 वा. चे सुमारास फियादीचे राहते घरासमोर सिंध्दाथनगर सवतगाव, ता. माळशिरस 4) हकिकत यात हकिकत अशी की, नमुद ता.वे. वेळी व ठिकाणी

 यातील आरोपी मजकुर यांनी यातील र्फियादीस यांना मागील भांडणाच्या कारणावरुन व टपरी काढण्याचे कारणावरुन शिवीगाळी दमदाटी करुन लाथाबुक्याने जबर  मारहाण करुन टपरीतील सामान अस्थव्यस्थ फेकून दिले व मोबाईल चा डिस्प्ले फोडून अंदाजे 3000/रु नुकसान केले आहे म्हणून वगैरे मजकुरची तक्रार फिर्यादी रेश्मा एजाज शेख यांची फिर्याद  आल्याने ती नॉ.कॉ. गुन्हा रजिष्टरी दाखल करून घेतली असून  फियादीस परभारे मा. न्यायालयात जाणेची समज दिली असून पुढील प्रतिबंधक कारवाई करणेकामी पोहेक/146 सलगर यांचेकडे दिली आहे म्हणून झाली आहे.         


 या आरोपीविरुद्ध अकलूज पोलिसात -बी एन एस-- ११५(२), बी एन एस --३५२, बी एन एस---३५१(२), बी एन एस --३२४(४) बी एन एस ३(५) गुन्हा दाखल झाला आहे

     याबाबत फिर्यादीचे म्हणणे आहे की एनसीआर दाखल करून आज २१/२२ दिवस झालेले असताना सुद्धा मला अद्याप न्याय मिळाला नसुन आज ही मी त्यांच्या दहशतीखाली असून टपरीतील मालाचे नुकसान केल्याने उपासमारीची वेळ आली असल्याचे सांगितले





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा