Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

*पुणे सय्यदनगर येथे "जय श्रीराम "का म्हणत नाही म्हणून मुस्लिम धर्मगुरूंना डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न?*

 


*संपादक--- हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो-9730 867 448

पुणे (सय्यदनगर) येथे "जय श्रीराम" का म्हणत नाही म्हणून मुस्लिम धर्मगुरूंना मारहाण करून मॉबलिंचीग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने काळेपडळ पोलीस ठाण्यात मॉबलिंचीग करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात अशा घटना घडत आहे ही चिंताजनक बाब असून असे प्रकार महाराष्ट्रात नव्हे तर देशात मागील दहा वर्षात वारंवार घडत आहेत आणि एका विशिष्ट समाजालाच टार्गेट करून हा प्रकार होत असून याला सर्वस्वी सत्ताधारी शासनच जबाबदार असल्याने अल्पसंख्यांक समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .अशीच घटना सय्यद नगर पुणे येथे घडले असून त्याबाबत काळेपडळ हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे.



जबाव ता.११/१२/२०२४

मी अब्दुलरकिब जमरुल शेख, वय ३२ वर्षे, धंदा नोकरी, रा. गल्ली नं.२३. सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे, कायमचा पत्ता-किशनगंज, बिहार, मो.क्र.८७६६९९७७०२


भी समक्ष काळेपडळ पोलीस ठाणे येथे हजर राहुन लिहुन देतो की, मी वरील दिले पत्त्यावर राहण्यास आहे. तसेच मी मुळचा राहणारा किशनगंज, बिहार येथील रहीवाशी असून माझ्या मुळगावी माझे आई वडील व भावंडे हे राहण्यास आहे. मी सय्यदनगर परिसरातील मुलांना त्यांचे घरी जावून ट्युशन देण्याचे काम करत असून त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो.



दि.१०/१२/२०२४ रोजी माझ्या कामानिमित्ताने व माझ्या मित्राला भेटण्याकरीता माझ्या दुचाकी अॅक्टीव्हा गाडी क्र. एमएच १२ डब्ल्यु.एन.६२३८ या गाडीने आदर्शनगर, ऊरळी देवाची येथे दुपारी १२.३० वा.च्या सुमारस गेलो होतो. त्यानंतर मी माझ्या मित्राला भेटून व माझे काम आटपुन परत सय्यदनगर येथे माझ्या राहते घरी येत असतना दुपारी ०१.४५ वा च्या सुमारास जेएसपीएम कॉलेज पाठिमागील रोडवर आलो असता मला सदर ठिकाणी माझ्या पाठिमागुन एका दुचाकी(गाडी नंबर MH-12 RD- 8944 ) या गाडीवर तीन अनोळखी इसम आले. त्यांनी माझ्या डाव्या बाजुने येवून माझ्या दुचाकी गाडीवर लाथ मारून मला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच मला गाडी थांबविण्याबाबत बोलून मला शिवीगाळ केली. परंतु मी घाबरल्यामुळे माझे दुचाकी वाहन हे जोराने चालवून आदर्शनगर येथील बेकर्स फ्लेवर्स या बेकरीजवळ आलो व सदर ठिकाणी माझी गाडी थांबविली. त्यानंतर सदरची मुले हे दुचाकीवरुन माझा पाटलाग करत तेथे आली. त्यावेळी ते त्यांचे दुचाकी गाडीवरुन उतरुन माझ्या दिशेने आले असता त्यांनी मला "जय श्रीराम" चा नारा लावणेबाबत सांगितले. त्यावेळी मी त्यांना आमच्या मध्ये नारा लावत नसलेबाबत सांगितले. परंतु त्यापैकी एका इसमाने माझ्या डोक्यावर जोरात हाताने मारुन टोपी काढून खाली फेकली. त्यांनी मला पुन्हा मारण्यास सुरवात केली असता, नमूदचे इसम हे जोरजोरात मला शिवीगाळ करुन "तुम लोगोका इथर क्या काम है, दाढी टोपी पेहनकर इधर आणेका नहीं. मैं सबको खतम करूंगा, तेरा तो आज व्हिकेट ही वालता हूँ असे म्हणत मला जिवे ठार मारण्यासाठी एक मोठा दगड अंदाजे दोन ते आडीज किलोचा घेवून तो माझ्या दिशेने अंगावर धावून आला व सदरचा दगड हा माझ्या दिशेने जोराने फेकला. त्यावेळी मी माझे जीव वाचविण्यासाठी बाजुला सरकलो. अन्यथा मला दगड लागुन मी जागीच ठार झालो असतो. नमूदचे दगड हे बेकरीच्या काचेला लागुन काचेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यादरम्यान त्यांनी माझ्या दुचाकी गाडीवर त्यांचे हातामध्ये असलेली काचेची बाटली व दगडांनी मारण्यास सुरवात केली. त्यानंतर बेकरीमधील लोकांनी मला वाचविण्यासाठी पुढे आले व सदरील तीन इसमांस बाहेर ढकलुन दिले. तरी सदरील इसम हे मोठ मोठयाने घोषणा देवून शिवीगाळ करत होते. माझ्या दिशेने मला मारण्यासाठी दगडफेक करण्यास सुरु केले. त्यावेळी बेकरीमधील इसमाने व मी जोर जोरात आरडा ओरडा करुन त्यांना बाहेर हकलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मी सदर ठिकाणाहुन माझी गाडीवरून पळुन सय्यदनगर येथे आलो व घडलेल्या प्रकारबाबत माझ्या ओळखीचे असलेले मौलाना इजहार आलम, हाफिस कलाम यांना सांगितले. मी घाबरल्यामुळे तक्रार देणेकरीता पोलीसांत गेलो नाही. परंतु माझ्या सहकारी मित्रांनी मला धीर दिल्यामुळे मी आज रोजी नमूद इसमांविरुध्द तक्रार देणे करीता काळेपडळ पोलीस ठाणे येथे आलो आहे. तरी वरील तीन इस्मानी जाणीवपूर्वक जातीय मानसिकतेतून दंगल घडविण्याच्या उद्देशाने वित्त व मनुष्यहानी करून मी मुस्लिम समाजाचा असल्याने माझ्या दाढी व टोपी या पेहराव्यावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने माझा कोणाशी काही एक संबंध नसताना विनाकारण शिवीगाळ करून मला जीवेठा मारण्याचा प्रयत्न केला तरी नमूद इसमाविरुद्ध माझी कायदेशीर तक्रार आहे 

वरील माझा जवाब व माझे सहकारी व एडवोकेट तौसीफ शेख यांचे समक्ष घेतला असून तो मला हिंदीतून समजावून सांगितला असता तो खरा आहे 

याबाबत फिर्यादीने आरोपी १)यश अशोक ताटे वय 21 वर्ष राहणार रॉयल बेकरी संत सावता माळी चौक पापडे वस्ती काळेपडळ हडपसर पुणे आरोपी क्रमांक २) ओंकार चंद्रकांत काटकर वय 26 व्यवसाय डिलिव्हरी बॉय राहणार गणेश कॉलनी लाईन नंबर चार सर्वे नंबर 35 गजानन महाराज मंदिराजवळ हडपसर पुणे मोबाईल नंबर 88 88 37 44 42 यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक व कलम १८६४/ २०२४ भारतीय न्याय संहिता कलम १९६, १२६(२), १२५(२) ३५२, ३५१(२) गुन्हा दाखल झाला असून दाखला अधिकारी म्हणून "सहाय्यक पोलीस निरीक्षक -अमित शेटे- काळेपडळ हडपसर पोलीस स्टेशन, तर तपासी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक -प्रवीण आब्दागिरे, काळेपडळ हडपसर पोलीस स्टेशन हे अधिक तपास करत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा