Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

*सदाशिवनगर येथील 'कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय' व जुनिअर कॉलेज चे -शेंडेवाडी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न*

 


*विशेष -प्रतिनिधी,राज मुलाणी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो-8408 817 333

कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज सदाशिव नगर चे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे शेंडेवाडी तालुका माळशिरस येथे आयोजित करण्यात आले. शिबिराचा 

उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रस्ताविक काशीद सर केले. अनुमोदन बागल सर यांनी दिले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पत्रकार तथा समाजसेवक सुरेश नाना शेंडे साहेब हे लाभले. त्यांनीच कार्यक्रमास बहुमूल्य सहकार्य केले. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध डॉक्टर ज्ञानदेव ढोबळे होते. त्यांनी आपल्या मनोगतात युवकांचे आरोग्य व व्यसनाधीनता याबाबतीत जागृती पर व्याख्यान दिले. विद्यालयाचे प्राचार्य विजय निंबाळकर यांनी स्वयंसेवकांना श्रमदानाची प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजना या विभागाचे देशाच्या विकासातील भूमिका स्पष्ट केली 



  सदर शिबिरास शेंडेवाडी, तामशीदवाडी खूळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गोपाळ भगवान डुबल माझी सरपंच राजाभाऊ ढोबळे हेही उपस्थित होते. स्थानिक प्रशाला समितीचे सदस्य अंकुश डुबल ,फडतरे आबा, मोहनानंद महाराज. भुजबळ सर, सोमनाथ भोसले, विष्णू भोंगळे व ग्रामस्थ पोपटराव शेंडे, बबनराव शेंडे साहेब हजर होते. चेतन शेंडे यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. सूत्रसंचालन माध्यमिक विभागाचे श्री. काशीद सर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक बागल बीव्ही यांनी केले होते. प्राध्यापक अनिल पाटील, प्राध्यापिका ढोपे मॅडम यांनी सदर कार्यक्रमास परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सावता माळी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जवळच असलेल्या वश्या मारुती या तीर्थक्षेत्र

 परिसरात स्वच्छता अभियान राबविले. सदर स्वच्छता अभियानात जुनिअर कॉलेजचे प्रमुख प्राध्यापक धनाजी जाधव, प्राध्यापक अनिल पाटील, प्राध्यापक सुजित पांगे, प्राध्यापिका ढोपे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाच्या स्वयंसेवकांनी श्रमदानामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा