*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापुरात तरुण भीमसैनिकांचा लक्षवेधी अर्ध नग्न मोर्चा
सोलापूर: आत्मभान आंदोलन अंतर्गत भीमसैनिकांनी एकत्रित येऊन अन्याय-अत्याचार विरोधी युवा कृती संघटनेच्या माध्यमातून अर्ध नग्न मोर्चा काढून लक्ष वेधले. शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धरण करत आत्मभान मूक आंदोलनात शेकडो भीमसैनिक सहभागी झाले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करत आत्मभान मूक आंदोलनाला सुरुवात झाली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली.
दरम्यान परभणी कोम्बिंग ऑपेरेशन आणि शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या सोमीनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीत मृत्यू झाला, ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे.
या प्रकरणाचा सोलापूरमधील ‘अन्याय-अत्याचार विरोधी युवा कृती संघटना’ या अमानुष कृत्याविरोधात ‘आत्मभान आंदोलन’ करीत निषेध करण्यात आला.
2. परभणी प्रकरणी खालील प्रमुख मागण्या…
1. पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी.
कलम 176 (1A) सीआरपीसी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी.
2. न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधिशाकडून न करता सिटींग न्यायाधिशामार्फत करावी.
3. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह इतर पोलीस अधिका-यांवर कलम ३२ अन्वये, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3(1) आणि 3(2) प्रमाणे गुन्हे दाखल करावेत. सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
4. परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने सीसीटीव्ही जप्त करून ते सीसीटिव्ही तपासावे.
5. सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने 50 लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तिस तातडीने शासकीय नोकरी देवून त्यांचे पुर्नवसन करावे.
6. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वाचे पुन्हा एकदा न्यायाधिश यांच्या उपस्थितीत मेडीकल करावे.
7. पोलिसांनी केलेल्या कोबींग कारवाईत बौध्द वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरांची नुकसान भरपाई द्यावी. जिल्हा प्रशासनाने त्या सर्व घरांचे तातडीने पंचनामे करून घ्यावे.
8. पोलिसांच्या कोबिंग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
9. संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
. १० डिसेंबर २०२४ रोजी पार पडलेला सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक यांची चौकशी करावी. यासोबत त्या मोर्चातील सर्वांची भाषणे तपासून त्यांच्यावर कारवाई करावी.
या प्रमुख मागण्यांसाठी आज युवक रस्त्यावर उतरुन संविधानीक मार्गाने अंदोलन करत आहे.
या आंदोलनात पँथर अतिश बनसोडे, सत्यजित वाघमोडे, अनुराग सुतकर,सुमित शिवशरण, चंद्रकांत सुरवसे यांच्यासह शेकडो संविधानवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा