*उपसंपादक --नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माहेर संस्था,तारवेवाडी,जि.रत्नागिरी आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी कवी इंद्रजीत पाटील यांच्या ' चिबाड ' या कवितासंग्रहाची निवड झाली होती.त्यानिमित्ताने त्यांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन यथाेचित सत्कार करण्यात आला.हा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २९ व्या वर्धापनदिनाचे आैचित्य साधून माहेर संस्थेच्या संचालिका संस्थापिका मा.सिस्टर लुसी कुरियन दीदी,ज्येष्ठ पत्रकार व लेखक मा.श्री.राजेंद्रप्रसाद मसुरकर,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मा.श्री.मनाेज पाटणकर,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा.साै.समृध्दी वीर,निवृत्त प्राचार्य मा.श्री.सुरेश नाईक,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका श्रीमती श्रध्दा कळबंटे,पी.एम.आय मा.श्री.अभय तेली,अॅड.सुयाेग कांबळे,अॅड.महेंद्र मांडवकर,साै.हर्षदा गावडे,साै.विद्याताई बाेंबले,जितेंद्र तारवे,साै.तन्वी काेकजे,श्री.विनायक खानविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. माहेर बालगृह,निराधार महिला व पुरूष वृध्दाश्रम,समर्थ नगर, तारवेवाडी,हातखंबा याठिकाणी या साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.हिराबेगम मुल्ला,सुनिल कांबळे,वृषभ खडसे,शितल हिवराळे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले हाेते.' चिबाड ' या कवितासंग्रहास अल्पावधीतच मिळालेला हा पाचवा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार असून इंद्रजीत पाटील यांच्या साहित्यिक कारकिर्दीसाठी चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा