*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
पुरंदावडे ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी "श्री रेणुका माता यात्रेचे "आयोजन दि. ११/१२/२०२४ ते दि. १३/१२/२०२४ या तीन दिवशी करण्यात आले आहे.
बुधवारी दि. ११/१२/२०२३ रोजी श्री रेणुका माताला साडी चोळी करून यात्रेस प्रारंभ होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ४ ते ५ वा. व रात्री ७ ते १० वा. नाळेमळा येथे माहेरघरी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
गुरुवार दि. १२/१२/२०२३ रोजी गंध लिंब, दुपारचा महानैवेद्य व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. १३/१२/२०२३ रोजी गावातून सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत छबिना व ४ वाजता होमाचा (किच) कार्यक्रम होणार आहे.
तरी पुरंदावडे व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेणुका माता देवीचे पुजारी जगूबाई बाजीराव मोहिते, शिवाजी बाजीराव मोहिते, दादासो शिवाजी मोहिते, आप्पासाहेब शिवाजी मोहिते, आदित्य दादासाहेब मोहिते यांच्यावतीने करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा