*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
उमरगा तालुक्यातील अपंग निराधार व विधवा लाभार्थ्यांना शासनाकडून मासिक मिळणारे आर्थिक मदत अद्याप गेल्या सहा ते सात महिन्यापासून न मिळाल्याने
प्रहार अपग कांती संघटना, उमरगा तालुका व सर्व दिव्यांग व निराधार यांनी ती मासिक मिळणारी आर्थिक मदत तातडीने द्यावी अशी मागणी तहसीलदार उमरगा यांना निवेदनाद्वारे केली असून 16 डिसेंबर 2024 पर्यंत आर्थिक मदत पगारी वितरित न केल्यास 17 तारखेपासून उमरगा तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील सर्व दिव्यांग निराधार व विधवा यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
उपरोक्त विषयांस अनुसरून निवेदन करण्यात येते की, शासनाच्या वतीने अपंग, निराधार, व विधवा यांना आर्थिक मदत दिली जाते. परंतु, गेल्या ५ ते ६ महिण्यापासुन अपंग व निराधारांच्या पगारी अद्याप पर्यंत मिळालेले नाहीत. याबाबत आम्ही तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता, आम्ही प्रस्ताव बँकेकडे पाठविलेला आहे असे त्याने सांगितले. त्यानंतर आम्ही बँकेकडे विचारणा केली असता त्यांचे म्हणने आहे 'की, आम्हांला अद्याप पर्यंत तहसील कार्यालयाकडून याची पोच मिळालेली नाही या संभ्रमामुळे आमच्या पगारी गेल्या ५ ते ६ महिण्यांपासुन मिळालेले नाहीत.
तसेच शासनाच्या वतीने १५००/- रूपये मिळणे गरजेचे असताना काही लाभार्थ्यांना १३००, तर काहींना १२०० व १५०० रूपये मिळत आहे. अशी तफावत पगारीमध्ये आहे. याबाबत विचारणा केली असताना शासनाकडुन अश्या प्रकारची निधी मिळत असल्यामुळे आम्ही अश्या प्रकारचे वितरण करत असल्याचे सांगितले जात आहे.
तरी उमरगाचे तहसीलदार यांनी आम्हां अपंग व निराधारांच्या समस्या दुर करून शासनाकडून मिळणाऱ्या पगारी वेळेवर आमच्या अकाउंट वर टाकुन आमचे जीवन सुलभ करण्यास सहकार्य करावे ही विनंती. तसेच येत्या १६ तारखेपर्यंत पगारी वितरीत नाही झाल्यास दि १७ तारखेपासुन आपल्या कार्यालयसमोर तालुक्यातील दिव्यांग व निराधारा व विधवा यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल. तसेच होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असाही इशारा निवेदनाद्वारे दिला आहे
माहितीस्तव प्रत सादर:
. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव
. पोलिस अधिक्षक , जिल्हा मुख्यालय, धाराशिव
उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय, उमरगा
पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन उमरगा.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा