*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी
-टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आण्णासाहेबांवर टाकलेल्या जिल्ह्याच्या जबाबदारीचा संपूर्ण ताकदीनिशी वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिल असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी केले.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अण्णासाहेब कोकाटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा सराटी येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी गारटकर बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर भरणे, प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, प्रविण माने, श्रीराज भरणे, प्रताप पाटील, सचिन सपकाळ, नवनाथ रूपनवर, आबा देवकाते, संग्राम निंबाळकर, आतुल झगडे, अशोक घोगरे, रणजित गिरमे, बाळा ढवळे, आमर गाडे नगरसेवक , सुरेश भाऊ कोकाटे, बाळासाहेब कोकाटे, मोहन काटे, धनंजय रणवरे, विशाल कांबळे, पाडुरंग काबळे, संतोष कोकाटे, पै बापु कोकाटे आदि मान्यवर उपस्थीत होते.
गारटकर पुढे म्हणाले, संघटन बांधणीचे शास्त्र काही ठराविक लोकांनाच अवगत असते. त्यामुळे आण्णासाहेब कोकाटे यांनी सराटी, बावडा परीसरात त्यांचे संघटन बांधणीचे कौशल्य संपूर्ण जिल्हाभर राबवून संघटन मजबूत करावे. जिवनात तडजोड महत्वाची असून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे ज्याला जमले ते यशस्वी झाले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणाराच कार्यकर्ता व नेता बनतो तोच गुण आण्णासाहेब कोकाटे यांच्यामध्ये आहेत.
यावेळी प्रताप पाटील, अशोक घोगरे, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, सतीश पांढरे, अतुल झगडे, सचिन सपकाळ, राजेंद्र कुरळे आदिंची भाषणे झाली. यावेळी आण्णासाहेब कोकाटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमीत्त मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
बावडा लाखेवाडी जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून प्रबळ दावेदार असणारे अण्णासाहेब कोकाटे हे सर्वसामान्य कुटुंबातून येतात. त्यांची काम करण्याची पद्धतीमुळे ते सर्वसामान्यांमध्ये सर्व परिचित आहेत. बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये आज पर्यंतच्या इतिहासात घराणेशाही असणारे उमेदवारच देण्यात आले आहेत. यावेळी मात्र घराणेशाहीला फाटा देऊन सर्वसामान्य कुटुंबातील व सतत कामात अग्रस्थानी असणारे अण्णासाहेब कोकाटे यांनाच उमेदवारी द्यावी अशी सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित मान्यवरांकडे मागणी करण्यात आली.
फोटो - सराटी येथे आण्णासाहेब कोकाटे यांचे अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा