*सोलापूर-- प्रतिनिधी*
*आंबिद---बागवान*
*टाइम्स 450न्यूज मराठी*
पोलीस असल्याची बतावणी करून, जेष्ठ नागरीक वृध्द महीलेची फसवणूक करून, सोन्याच्या बांगडया लंपास करणारे सराईत ईराणी आरोपी सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून या बाबत सविस्तर वृत्त असे की
दिनांक ३०/०७/२०२४ रोजी जुळे सोलापूर येथील संतोषी माता मंदिर जवळील, एल.आय.सी. ऑफिसचे बोळामध्ये, एक अनोळखी इसमाने यातील एका ६५ वर्षाच्या वृध्द महिलेस थांबवुन, ” मी साध्या वेषातील पोलीस आहे. आताच येथे शुक्ला यांची चैन काढून घेतली आहे. म्हणून, मला आमच्या साहेबांनी ड्युटीसाठी पाठविले आहे. मी, काही तुमचे सोने घेत नाही, तुमचे सोने घेऊ नये म्हणून तुम्ही तुमचे सोने काढून पर्स मध्ये ठेवा ” असे म्हणून, त्या वृध्द महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, त्या वृध्द महिलेच्या हातातील बांगड्या काढुन, एका कागदामध्ये गुंडाळून तो गुंडाळलेला कागद, त्या वृध्द महिलेस न-देता, हातचलाखीन स्वतःकडे ठेवुन, त्याऐवजी, स्टीलचे कडे गुंडाळलेला कागद त्या महिलेच्या पर्समध्ये ठेवुन निघुन गेले. त्याबाबत, विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं.३६१/२०२४ मा.न्या.सं. कलम २०४, ३१८(४), ३१९(१), ३१६ (२), ३१७ (२) अन्वये, दि.०१/०८/२०२४ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने, मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे, गुन्हे शाखेकडील पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथक हे, गुन्हा घडल्यापासून समांतर तपास करीत असताना, ०५ महिने अथक परिश्रमानंतर तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनिय बातमीचे माहितीचे आधारे, वरील नमूद गुन्हा हा, सराईत गुन्हेगार नामे १) कासिम युसुफ बेग (ईराणी), रा. ईराणी वस्ती, शिवाजीनगर, पुणे २) महमद ऊर्फ जॉर्डन युसुफ ईराणी रा. खोजा कॉलनी, ईराणी वस्ती, सांगली यांनी केला असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली.
त्या अनुषंगाने, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी, दिनांक २३/१२/२०२४ रोजी, आरोपी क्र. १) कासिम युसुफ बेग (ईराणी), वय ३४ वर्षे, रा. प्लॉट नं. ४१, विष्णु कृपा नगर, शिवाजी नगर, पुणे-५ यास पुणे येथे सापळा रचून, अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडील तपासादरम्यान त्याने सदरचा गुन्हा हा, त्याचा साथीदार महमद ऊर्फ जॉर्डन युसुफ ईराणी रा. खोजा कॉलनी, ईराणी वस्ती, सांगली याचेसह केला असल्याची कबुली दिल्याने त्यास अटक केली. त्यानंतर, दिनांक २४/१२/२०२४ रोजी, आरोपी क. २) महमद ऊर्फ जॉर्डन युसुफ ईराणी, वय ३० वर्षे, रा. सहयाद्रीनगर खोजा कॉलनी, ईराणी वस्ती, विश्रामबाग, सांगली यास सांगली येथुन छत्रपती शिवाजी महाराज माजी मंडई भागात सापळा रचून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी, त्याचेकडे केलेल्या तपासादरम्यान, सदरचा गुन्हा साथीदार कासीम वेग याच्यासह केला असल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.
त्याप्रमाणे, वरील नमुद दोन्ही आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता, आरोपी नामे- महमद ऊर्फ जॉर्डन युसुफ ईराणी याने सदर गुन्हयातील वृध्द महीला फिर्यादीकडून हातचालाखीने काढून घेतलेल्या ०४ सोन्याच्या बांगडया, सोनार नामे सुनिल वामनराव मानगावंकर रा. मिरज यास विकले असल्याचे सांगितले, त्याअनुषंगाने आरोपी नामे ३) सुनिल वामनराव मानगावंकर, वय ५५ वर्षे, रा. कुरणे गल्ली, ज्योतिबा मंदीर जवळ, नदी वेस, मिरज सांगली यास दिनांक २७/१२/२०२४ रोजी अटक करून, पोलीस कोठडीतील तपासादरम्यान, त्याच्याकडून गुन्हयातील ४,००,०००/- रू किमतीच्या, ७०.३७ ग्रॅम वजनाच्या ०४ सोन्याच्या बांगडया हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
आरोपी क्रमांक १) कासिम युसुफ बेग, याचेवर महाराष्ट्र व इतर राज्यात मिळुन, ०५ गुन्हे दाखल आहेत. २) मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी, यावेवर महाराष्ट्र व इतर राज्यात मिळून, १४ गुन्हे दाखल आहेत. ३) सुनिल वामनराव मानगांवकर, याचेवर महाराष्ट्र व इतर राज्यात मिळुन, १४ गुन्हे दाखल आहेत.
ब) तसेच, दि.२२/१२/२०२४ रोजी इसम नागे १) सागर उपेंद्र येमुल, वय-३२ वर्षे, रा.१५९४ कुचन नगर, सोलापुर, सध्या रा.बोळकोटे नगर, पिठाच्या गिरणीमागे, एम.आय.डी.सी. सोलापुर व २) अंबादास अंपय्या करें, वय-३० वर्ष, रा. करली नगर, जिव्हेश्वर मंदीरच्या पाठीमागे, बोळकोटे नगर जवळ, एम.आय.डी.सी. सोलापुर यांना ताब्यात घेवुन, त्यांच्याकडून, (१) एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, गुरनं. ८६६/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०३ (२) (मोटार सायकल चोरी), (२) फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुरनं. ६९९/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२) (रेडमी कंपनीचा नोट १३ प्रो प्लस मोबाईल चोरी), (३) जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुरनं. ६८९/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) (मोबाईल फोन) अन्वये, दाखल एकूण ७२,०००/- रूपये किंमतीचे ०१ मोटार सायकल व ०२ मोबाईल चोरी असे एकूण ०३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अशा प्रकारे, सोलापूर शहर गुन्हे शाखेने, वरील नमूद ०५ आरोपींकडून, ०१ बतावणी, ०१ मोटार सायकल व ०२ मोबाईल चोरी असे ०४ गुन्हे उघडकीस आणून, एकूण ०४,७२,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी, मा.श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे/वि.शा., श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सपोनि दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, संपन सय्यद, वसीम शेख, सुभाष मुंढे, शांतीसागर जेनुरे, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे, शैलेश बुगड, विठ्ठल यलमार, महिला पोलीस अमलदार निलोफर तांबोळी, चापोशि सतिश काटे, अनिखेत खत्री, बाळासाहेब काळे, फरदीन शेख, सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा