Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

नरसिंहपूर परीसरातील गावोगावी दत्तजयंती सोहळा पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा,

 




*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147




----- दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषात भजन, कीर्तनाच्या भक्तिरसात रंगून परीसरातील गावोगावी दत्तजयंती भाविकांच्या उपस्थितीत आरती करून फुले टाकत साजरी करण्यात आली.




     नीरा नरसिंहपूर परीसरातील गावोगावी दत्तजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, गुरूचरित्र पारायण, दत्तजयंती सोहळा पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिर परीसर रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची सजावटीसह विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळाली. 



     सायंकाळी किर्तन व भजनी मंडळाच्या साथीने संपन्न करण्यात आले. दत्तजयंती निमित्त आरती घेण्यात आली त्यानंतर फुलांची उधळण करत जयघोष करण्यात आला. उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. पिंपरी बुद्रुक येथे राम महाराज शेळके यांचे किर्तन होऊन फुले वाहण्यात आली. गणेशवाडी येथे विराज पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर शिंदेवस्ती येथील सुनील गायकवाड यांच्या येथे दत्तजयंती सोहळा संपन्न झाला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा