Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

*आष्टा येथील "रेणुका देवीच्या" यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*


 

अकलुज ---प्रतिनिधी*

*केदार.--- लोहकरे*

  *टाइम्स 45 न्युज मराठी*

आष्टा येथील श्री रेणुका (यल्लमा) देवीची मार्गशीर्ष पोर्णिमा व श्री दत्त जयंतीनिमित्त दि.७ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत अखंड नाम जप,यज्ञ,श्री गुरूचरित्र पारायणासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

              शुक्रवार दि.१३ रोजी सायंकाळी ७:०० वाजता परडी सोडणे व रात्री १०:०० वाजता गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.शनिवार दि.१४ रोजी सकाळी ११:०० वाजता श्री देवीची महापूजा व नैवेद्य दुपारी २:०० वाजता श्री रेणुका सहस्त्राहुती होम,श्री रेणुका देवीच्या पालखीची शहरातून मिरवणूक, सायंकाळी ५ ते ८ श्री रेणुका देवीच्या मंदिरासमोर महाप्रसाद व रात्री १० वाजता श्री रेणुका देवीचा अग्नीहोत्र प्रवेश (किच) असे कार्यक्रम होणार आहेत.आष्टा शहर व परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका देवी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा