*उपसंपादक --- नूरजहाँ शेख*
*टाइम्स ४५ न्यूज मराठी*
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्ष पूर्ती सोहळ्यानिमित्त दिनांक ०२ व ०३ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित केलेल्या रयतेचा राजा - राजा शिवछत्रपती या महानाट्याला अकलूज येथे आज दि.२ पासून प्रारंभ होत आहे. १२५ बाय ७० फुटाच्या भव्य व्यासपिठावर हे महानाट्य साकारत असून सुमारे ९०० कलाकारांचा यामध्ये सहभाग आहे.
सहकार महर्षी शंकरराव व मोहिते पाटील जयंती समारंभ समिती अकलूज, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज व
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना कामगार वर्ग यांचे वतीने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकूल, अकलूज येथे भव्य महानाट्याचे आयोजन केले आहे.
या महानाट्यात छत्रपती चित्रपट कलावंत शंतनू मोघे, अभिनेत्री पल्लवी वैद्य, रवींद्र कुलकर्णी, अभिनेते विश्वजीत फडते हे प्रमुख भूमिकेत आहेत. याचे लेखक युवराज पाटील, दिग्दर्शक अजय तपकिरे व सूत्रधार डॉ. विश्वनाथ आवड आहेत. मागील काही दिवसापासून या महानाट्याचा सराव सुरू आहे.
यात घोडे, बैलगाड्या, पायदळ, मावळे दिसणार आहेत.
या महानाटयात शिव जन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्यांच्या शौर्याची गाथा उलगडणार आहे.
सहकार महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामसिंह मोहिते-पाटील, कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, यांच्या नेतृत्वाखाली विविध कमिट्या कार्यरत असून क्रीडा संकुल येथे याची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा