*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत दुधाचेअनुदान तत्काळ वितरीत करावे अशी मागणी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आयुक्त -पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
त्याबाबत निवेदनाद्वारे केलेली मागणी पुढील प्रमाणे,
महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान जाहीर केलेले आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनुदान प्रस्ताव तातडीने मंजूर करणे आवश्यक आहे दुध अनुदान वितरित करण्यासाठी उशीर होत आहे आद्याप जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अनुदान वितरीत झाले नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना ही अनुदान तात्काळ मिळाल्यास त्यांना दिलासा मिळणार असल्याने सदर अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून विनंती करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी यांचे अनुदान तातडीने वर्ग करणे आवश्यक आहे आपल्या स्तरावरील मंजुरी आवश्यक आहे आपण आपल्या जवळील प्राप्त प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत
त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
अशी मागणी करण्यात आली




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा