*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
दिनांक 15/11/2024 रोजी मंदिर संस्थांनी श्री तुळजाभवानी देवीचे पूजेचे दर निश्चित करण्याबाबत काढलेले पत्रानुसार दिनांक 22/11/2024 रोजी मंदिर प्रशासकीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करून आचारसंहितेचा भंग केल्याने संबंधीतावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी तुळजापूर येथील शिवसेनेचे श्याम पवार यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे याबाबत सविस्तर तक्रार अशी कि
1) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान जा.क्र.2024-25/श्री जुभमंसंतु/धार्मिक/1881
दिनांक 15/11/2024 चे पत्र.
2) अर्जदार यांनी दिनांक 18/11/2024 रोजी दिलेला तक्रारी अर्ज.
3) मा. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघ यांनी तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांना दिलेली नोटीस जा.क्र.2024/निवडणु/ वि.स.नि./ सीआर-127 दिनांक 18/11/2024.
उपरोक्त विषयी संदर्भ क्र. 2 नुसार अर्जदार यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन तुळजापूर यांनी दिनांक 15/11/2024 रोजी तुळजापुरातील भोपे, पाळेकर व उपाध्ये पुजारी मंडळाला सोबत घेऊन श्री तुळजाभवानी देवीचे पूजेचे दर निश्चित करण्याबाबत दिनांक 22/11/2024 रोजी मंदिरच्या प्रशासकीय कार्यालयात बैठक घेण्यात येत आहे.
सदरील बैठक निवडणुकीच्या आचारसंहिता चालू असल्याने मंदिर संस्थांचे तहसीलदार तसेच विश्वस्त यांच्या संगणपत करुन राजकीय उमेदवारास मदत होण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आचारसंहितेची कालावधी चालू असताना तुळजापुरातील व्यापारी व पुजाऱ्यांना दबाव आणण्यासाठी किंवा प्रभावित करण्यासाठी या बैठकीच्या आयोजन करण्यात आल्याचे दिसून येते. सदर बैठकीमुळ तुळजापूर शहरातील पुजारी व व्यापारी हे भयभित झाल्याचे दिसुन येत आहे.
सदरील बाब ही निवडणूक आचार संहितेचा भंग असून सदरील घटनेस जबाबदार असणाऱ्या मंदिराच्या तहसीलदार तसेच विश्वस्तांवरती तात्काळ आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात संबंधी अर्ज दिलेला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने मा. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी संदर्भ क्र. 3 नुसार तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांना दिनांक 18/11/2024 रोजी नोटीस देवुन 24 तासाच्या आत खुलासा या कार्यालयाकडे सादर करावा असे स्पष्ट नमुद केलेले आहे. परंतु निवडणुक निण्रय अधिकारी व सहाय्यक निवडणुक निण्रय अधिकारी हे जाणुनबुजुन दोषीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.
तरी आपणास विनंती की, सदरील बाब ही निवडणूक आचार संहितेचा भंग असून सदरील घटनेस जबाबदार असणाऱ्या मंदिराच्या तहसीलदार तसेच विश्वस्तांवरती तात्काळ आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा ही विंनती. अन्यथा वेळ प्रसंगी मा. मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे न्याय मागावा लागेल व वेळप्रसंगी न्यायालयातही दाद मागण्यात येईल यांची कृपया नोंद घेवुन संबंधीत तहसिलदार व विश्वस्त यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्या प्रमाणी योग्यती कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती.
आपला नम्र.
शाम आंबादास पवार
मो.क्र. 9822777166






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा