*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
मस्साजोग या गावचे मराठा समाजाचे आदर्श सरपंच संतोष (आण्णा) देशमुख यांचे दि.९.१२.२०२४ रोजी दिवसा ढवळ्या अपहरण करून कुरपणे, निघृण हत्या झाली त्यातील आरोपीना तात्काळ अटक करून एस.आय.टी. चौकशी व्हावी याकरीता सकल मराठा समाजाच्या वतिने बोंब मारो आंदोलन करणार असल्याचे निवेदन सकल मराठा समाज तुळजापूरच्या वतीने तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे
बीड जिल्हा केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे मराठा समाजाचे आदर्श सरपंच संतोष (आण्णा) देशमुख यांचे दि.९.१२.२०२४ रोजी दिवसा ढवळया अपहरण करून कुरपणे, निघृण हत्या करण्यात आली परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप पर्यत मोकाट असल्याने मराठा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राची एकता एकात्मता शांतता सुव्यवस्था आबाधित होऊ नये यासाठी गुन्हयातील सर्व आरोपीना तात्काळ अटक करून पिडीत कुंटुबांना न्याय देऊन कायद्याचे राज्य अस्तित्वात असल्याचे दर्शवावे याकरीता दि.१६.१२.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता तहसिल कार्यालय समोर सकल मराठा समाजाच्या वतीने बोंब मारो आंदोलन करून ही अटक न झाल्यास पुढील काळात मराठा समाज महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद घ्यावी. असाही इशारा निवेदनात दिला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा