*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांची आज मुंबईत बैठक संपन्न झाली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली तर दिवंगत नेते राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र आणि तरुण तडफदार आमदार रोहित दादा पाटील यांची मुख्य प्रथोदपदी निवड करण्यात आली आहे आमदार रोहित पाटील यांच्यावर लहान वयात मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते सर्व सर्व शरद पवार यांनी टाकली असून माळशिरस तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांचीही प्रथोदपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे तसेच विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबाबत अध्याप निर्णय झाला नसून आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एकूण नऊ विधानसभा सदस्य उपस्थित होते मात्र बीडचे आमदार संदीप क्षीरसागर अनुपस्थित होते
विधानसभा 2024 घ्या निवडणुकीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दहा जागा जिंकलेल्या आहेत त्यामध्ये तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तमराव जानकर विधानसभेत पोहोचले आहेत




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा