उपसंपादक -- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
- शब्दकळा साहित्य संघ,मंगळवेढा, जि.साेलापूर या संस्थेने ' शब्दकळा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार - २०२४ ' ने कवी इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्याचे जाहीर केले.सदर संस्थेचे अध्यक्ष प्रा.शशिकांत जाधव यांनी त्यांच्या ' कळ पाेटी आली आेठी ' या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहाची या पुरस्कारासाठी निवड केली असून दि.०५ जानेवारी २०२५,वार-रविवार राेजी संध्याकाळी ०५.०० वाजता. बहारदार कार्यक्रमात त्यांना मंगळवेढा या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे.कवी इंद्रजीत पाटील यांना हा २२वा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या ' कळ पाेटी आली आेठी ' या कवितासंग्रहास अल्पावधीतच हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. ग्रामीण भागातील दर्जेदार लिखाण करणाऱ्या या प्रतिभाशाली साहित्यकाचे सर्वत्र काैतुक हाेत असून श्री. माधवराव कुतवळ,पंडितराव लाेहाेकरे,चंद्रकांत पाटील,भागवत उकिरंडे,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी त्यांचे विशेष काैतुक केले.साहित्यिक इंद्रजीत पाटील यांचा ' शेलक्या बारा 'हा कथासंग्रह व ' कळ पाेटी आली आेठी ' हा कवितासंग्रह यावर्षी बऱ्याच पुरस्कारासाठी पात्र ठरत आहेत.भविष्यात त्यांची एकूण १२ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.या हरहुन्नरी साहित्यिकाचे महाराष्ट्रभर काैतुक हाेत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा