Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

*संग्रामनगर येथे" प.पू. सद्गुरु श्री शंकर महाराज "यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा स्थापना कार्यक्रम संपन्न*


 

*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

संग्रामनगर-अकलूज येथे परमपूज्य सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा स्थापना व दक्षिणमुखी मारुती मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठ्या धार्मिक उत्साहात संपन्न झाला.                                                       

            संग्रामनगर परिसरातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन दिनांक २४ व २५ डिसेंबर २०२४ असे दोन दिवस धार्मिक विधीसह शंकर महाराजांच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सहित दक्षिणमुखी मारुती मंदिराचे व शंकर महाराज मंदिराचे कलशारोहन करण्यात आले.या निमित्ताने ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक,पुण्याह वाचन,देवता स्थापना,मूर्ती व कलशाला जलाधीवास,धान्य दिवास, शय्यादीवास,अग्निस्थापना,

नवग्रह स्थापना,आवहित देवांचे हवन,तत्वन्यास हवन आदी धार्मिक विधी परमपूज्य श्रीपाद तीर्थ स्वामीजी महाराज सज्जनगड यांच्या हस्ते करण्यात आले. 

          या कार्यक्रमाचे पौरोहित वेदमूर्ती प्रवीण इनामदार गुरुजी व सहकारी श्रीक्षेत्र सज्जनगड यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन सर्व ग्रामस्थ,विश्वरूप प्रतिष्ठाण व सर्व मित्र परिवार यांच्या सहकार्याने झाले.सर्व विधी व धार्मिक कार्यक्रम यशस्वी पार पाडले.या निमित्ताने ऋतुजा पोतदार यांनी शंकर महाराजांच्या चित्राची अत्यंत सुबक रांगोळी काढली तसेच धार्मिक विधीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आला व हजारो भाविकांनी याचा आस्वाद घेतला.

 

*चौकट*

ज्या जागेत परमपूज्य सदगुरु श्री शंकर महाराजांचे मंदिर उभारले आहे या जागेत काही काळ शंकर महाराजांचे वास्तव्य होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा