Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

*परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा --माळशिरस ता.आरपीआय (डॉ. गवई गट) यांची मागणी*


 

*अकलूज----प्रतिनिधी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. राष्ट्रीय सरचिटणीस  डॉ.राजेंद्र गवई  यांच्या आदेशा नुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. जकापा कांबळे  यांच्या नेतृत्वाखाली .रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( गवई) माळशिरस तालुका च्या वतीने परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळी संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकाने विटंबना केलेल्या प्रकरणी माळशिरस तहसील कार्यालय येथे  तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून परभणी येथील भारतरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर . पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या. इसमाला व त्याच्या मागे कोणी  सूत्रदार आहे त्याच्या पाठीमागच्या सूत्रधारास महाराष्ट्र शासन सरकारने देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई  करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार माळशिरस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे         

                 याप्रसंगी  महाराष्ट्र उपाध्यक्ष.-श्रीकांत नानासाहेब सावंत , महाराष्ट्र उपाध्यक्ष. दत्ता सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष. वैभव धाइंजे, माळशिरस तालुका अध्यक्ष. रमेश दादा साळवे जिल्हा उपाध्यक्ष ,एडवोकेट नितीन भोसले . संजय धांईजे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नारायण समिंदर तालुका उपाध्यक्ष महादेव समिंदर तालुका सचिव गोविंद धांडोरे सर तालुका खजिनदार.गणेश करमाळकर तालुका कार्याध्यक्ष भालचंद्र यादव तसेच अमित सावंत. रोहित धांईजे. बाबा वाघमारे. बापू ओहाळ. शंकर वाघमारे. आदेश धांईजे. इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा