*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
पुणे महापालिका शिक्षण विभाग प्राथमिक व जिल्हा क्रीडा परिषद पुणे व सिलंबम असोसिएशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धेत मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य कविता पप्पू कंधारे यांचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुलगा कु
प्रसन्न पप्पू कंधारे यांनी पुन्हा एकदा २०२४-२५ जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) वर आपले नाव कोरले आहे. कु प्रसन्न कंधारे हा उत्कृष्ट अष्टपैलू कबड्डी खेळाडू असून तो सिलंबम स्पर्धेत देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील खेळून सुवर्णपदके जिंकली आहे. सिलबम स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून
यांची पुणे झोनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रसन्न कंधारे हा सिलबम स्पर्धेची तयारी प्रशिक्षक कुंडलिक कचाले यांच्या कडे पंडितराव आगाशे शाळा लाॅ काॅलेज रोड पुणे या ठिकाणी करत आहे तर कबड्डी सराव तो श्री बालाजी प्रतिष्ठान कबड्डी संघ कोथरूड पुणे या ठिकाणी प्रशिक्षक भरत शिळीमकर यांच्या कडे करत आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पप्पू दत्तात्रय कंधारे यांचा तो मुलगा आहे. नुकतीच हि स्पर्धा पुणे नारायण पेठ येथील शाळेत पार पडली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा