*सोलापूर ----प्रतिनिधी*
*आंबिद --बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासआठवले गटाच्या वतीने सोलापुरात मोर्चा. काढून परभणी घटनेचा निषेध
व्यक्त करण्यात आला
परभणी येथील संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निघालेला हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर, पासपोर्ट कार्यालय, सिद्धेश्वर प्रशालेमार्गे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आला या ठिकाणी पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अतुल नागटिळक यांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपूर्ण देशाच्या नागरिकांसाठी असून संविधाना मुळे सर्वांना हक्क मिळवून दिले असताना त्या संविधानाच्या रक्षणासाठी देशातील इतर कोणताही समाज रस्त्यावर उतरत नाही केवळ आंबेडकरी समाजात रस्त्यावर उतरतो हे दुर्दैव आहे अशी खंत त्यांनी व्यक्त करून त्यांनी घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपींना शिक्षा व्हावी अन्यथा रिपाइ यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.
परभणी घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत समाजातून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त जिल्हा परिषदेच्या समोर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा