उपसंपादक -- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळीनगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार गणेश करडे सर यांची तर पत्रकार गोपाळ लावंड यांची सेक्रेटरीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.दि.२७ रोजी माळीनगर येथील कारखाना गेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत या निवडी संपन्न झाल्या.
हि निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या निवडीनंतर माळीनगर पत्रकार संघाचे मार्गदर्शक मिलिंद गिरमे यांच्या हस्ते विद्यमान अध्यक्ष गणेश करडे आणि सेक्रेटरी गोपाळ लावंड यांचा सत्कार करून अभिनंदन केले.यावेळी माळीनगर पत्रकार संघाचे माजी संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक मिलिंद गिरमे,माजी अध्यक्ष. प्रदीप बोरावके,माजी सेक्रेटरी रितेश पांढरे आणि सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा