Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

*पाचगणी महाबळेश्वर प्रमाणेच जावळी, पाटण, तसेच महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम डोंगर माथ्यावरील 295 गावे नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये घेऊन जागतिक नकाशावर येणार---- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,*


 

*सातारा ----प्रतिनिधी*

 *मोहसिन -----शेख*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी- अकलूज*

सातारा : सातारा जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या एमएसआरडीसीचे कार्यालय महाबळेश्वर येथे सुरू करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.शिंदे कालाचानक एक दिवसाच्या मुक्कामासाठी दरेगावी शिंदे आले होते शिंदे नाराज आहेत असे राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी मात्र सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत चार दिवसांपूर्वीच तर मी पर्यटनाच्या बाबत आढावा बैठक घेतली होती पुन्हा एकदा नवीन महाबळेश्वरच्या संदर्भात व्हिडिओ पीपीटी शो त्यांनी प्रत्यक्ष स्वतः अधिकाऱ्यांकडून पाहिला

  


सातारा जिल्ह्यातील दरे, मुनावळे, तसेच कोयना नदीलगत असलेल्या २१४ गावांत नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या नवीन महाबळेश्वर विस्तारित प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा शिंदे यांनी या बैठकीत आढावा घेतला

.नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळाचे विकास प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती केली असल्याने या भागाचा सुनियोजितपणे विकास करण्याची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. त्यांचे कार्यालय साताऱ्यात असल्याने स्थानिकांना तिथे वारंवार जाणे अवघड होत होते. स्थानिक ग्रामस्थांची ही अडचण सोडवण्यासाठी एमएसआरडीसीचे कार्यालय तत्काळ महाबळेश्वरमध्ये सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.

त्यामुळे आता पाचगणी महाबळेश्वर प्रमाणेच जावळी पाटण तसेच महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम डोंगर माथ्यावरील 295 गावे, नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये येऊन जागतिक नकाशावर येणार आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा