Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

*महसूल सहाय्यकासह- उपविभागीय कार्यालयातील शिपाई सुध्दा अडकला 55 हजार रुपयाच्या लाच प्रकरणात?*


 

*सोलापूर--- प्रतिनिधी*

*आबिद बागवान*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

सोलापूर :  शेतजमीनीच्या वहिवाटीस हरकतीवर मंडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावर दाखल अपिलात  बाजूने निर्णय देण्यासाठी ५५ हजाराची लाच स्विकारल्याच्या गुन्ह्यात एसीबीच्या पथकानं उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते याच्यासह दोघांना रंगेहाथ पकडलंय. हा खळबळजनक प्रकार पंढरपुरातील उपविभागीय कार्यालयात सोमवारी घडलाय. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.


याबाबत मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांनी मंडल अधिकारी, खर्डी  यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. तो अर्ज हरकत घेऊन नामंजूर करण्यात आला होता. तक्रारदार यांच्या अर्जावर नामंजूर आदेश दिल्याने, त्या आदेशाविरूध्द तक्ररदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे अर्ज करून अपिल दाखल केले होते. 


त्या अपिलाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते (वय ३६ वर्षे, नेम- उप विभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर रा. गट नं. ४१० विसावा मंदिराच्या जवळ, वाखरी) आणि कार्यालयीन शिपाई नितीन शिवाजी मेटकरी (वय ५३ वर्षे, नेम-उप विभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर रा. गट नं. ७५/१ गणपती नगर, पंढरपूर) यांनी ६०,००० रुपये लाचेची मागणी केली. या अर्जाची पडताळणी करून पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी ही कामगिरी पार पाडली.


यावर तडजोडी अंती ५५,००० रुपये आरोपी किशोर भगवान मोहिते व स्वतःकरीता स्विकारण्याचे मान्य करून शिपाई नितीन मेटकरी यांना लाचेची रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी उभयतांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे.


ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (ला.प्र.वि., पुणे), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे (ला.प्र.वि., पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, (ला.प्र.वि. सोलापूर), पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस निरीक्षक (लाप्रवि, सोलापूर) यांच्यासह पोलीस अंमलदार एएसआय/सायबण्णा कोळी, पोना/संतोष नरोटे, पोकॉ/गजानन किणगी, पोकॉ/सचिन राठोड, चालक पोह/राहुल गायकवाड (सर्व नेमणुक - अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर)  यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा