*उपसंपादक - नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
गणेशगांव (ता.माळशिरस) येथील गीताई विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सीताराम महादेव शेंडगे तर व्हॉईस चेअरमन पदी फकृद्दीन गुलाब शेख यांची बिनविरोध निवड झाली.या निवडीसाठी सहाय्यक निबंधक अकलूज येथील निवडणूक निर्णय अधिकारी यादव साहेब यांनी काम पाहिले.त्यांनी चेअरमन,व्हॉईस चेअरमन पदाची बिनविरोध निवडणुक झाल्याचे घोषित केले
या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे व्हॉईस चेअरमन हनुमंत सोलनकर,गणेश विकास पॅनलचे पार्टी प्रमुख दादासाहेब नलवडे, गणेशगावचे विद्यमान सरपंच सदाशिव शेंडगे,माजी सरपंच पोपट रुपनवर रामचंद्र ठोंबरे, नजीर शेख,जालिंदर लिगाडे , गुलाब शेख, संतोष नलवडे, विशाल नलवडे,बालम शेख,अमोल शेंडगे, बाळासाहेब शेंडगे,अहमद पठाण दत्तू शेंडगे,शाहजहान पठाण, वाहिद शेख,संचालक मंडळ संभाजी शेंडगे,शिवाजी शेंडगे, वसंत ठोकळे,गणपत रूपनवर, तानाजी शेंडगे,रामचंद्र मोरे, मुक्ताबाई खरात,छबूबाई नलवडे, वसंत लिगाडे,आबासाहेब बाबर, पत्रकार नूरजहाँ शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मार्गदर्शन करताना त्यांनी उपस्थितांचे आभार मानून.नूतन चेअरमन सीताराम शेंडगे म्हणाले संस्था चांगल्या प्रकारे चालवून सभासदांना १००% लाभ देण्याचा प्रयत्न करू.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंडलिकराव शेंडगे यांनी केले तर सचिव अण्णासाहेब बाबर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*गीताई विकास सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी -सिताराम महादेव शेंडगे तर व्हाईस चेअरमन पदी-फक्रुद्दीन गुलाब शेख यांची निवड झाल्याबद्दल टाइम्स 45 न्यूज मराठी ग्रुपच्या वतीने हार्दिक अभिनंदन*🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा