Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

*महाराष्ट्र 6 हजार मुली हरवल्या* *सांगलीतील एका शाळेतून दोन मुली गायब....* *मुलांच्या आमिषाला बळी न पडण्यासाठी शाळेत महिन्यातून* *एकदा मुलींचे समुपदेशन व्हावे!...*


 

*इकबाल बाबासाहेब मुल्ला*

*(पत्रकार)---- सांगली*

 *मो:- 8983 587 160*

हराम ची कमाई असेल आणि आई - किंवा वडील व्यभिचारी (लफडेबाज) असतील तर मुलांमध्ये 100% त्यांचे गुण आणि ( दुर्गुण ) येतात. 4 दिवसापूर्वी सांगलीच्या  राजवाडा चौकातून बदाम चौकाकडे.  येताना मला  8 वी तील (सुप्रसिद्ध शाळेतील ) एक मुलगी.  आणि 35 - 40 वर्षाचा तरुण बोलत - बोलत चालले होते.ते  लफडे* होते हे पाहताच क्षणी समजतं होते. मुलीचे वय *14*  आणि त्या तरुणाचे वय 35 असे भिन्न होते. आजकाल कित्येक मुली या तरुणांच्या या "सापळ्यात"  अडकतात, मोबाईल अथवा इतर पैशाच्या आमिषाने  आकृष्ट होतात, मुलांना भेटतात. मुले त्यांचा आक्षेपार्ह  व्हिडिओ  काढतात आणि फोटोंचा वापर करत ब्लॅकमेलिंग  करत त्या मुलींना पळवण्यात येते आणि कालांतराने त्यांची  देहविक्री  साठी वेश्या म्हणून त्यांना "विकले" जाते. या लहान मुलींना - तरुणींना हे माहित आहे का ??? त्यांचा "बुद्धिभेद"  व्हावा त्यांना अक्कल यावी म्हणून या लेखाचे "प्रयोजन"  आहे.



महाराष्ट्रात 2 वर्षात आत्तापर्यंत 6000 तरुणी गायब झाल्या आहेत. त्यांचा अजूनही ठावठिकाणा  लागलेला नाही. कुठे असतील त्या तरुणी ?? काय झाले असेल त्या तरुणींचे ?? अवयव. काढून "परदेशी" विकणारे रॅकेट भारतात आहे. मुंबईत अक्षय  शिंदे  याच्या "एन्काउंटर" वेळी देखील त्या शाळेतील मुली गायब होतं होत्या.आणि अक्षय शिंदे त्याचा "साक्षीदार" होता. तो सर्व "भांडे"  फोडेल म्हणून तर अक्षय शिंदेचा  खोटा  एन्काउंटर. " केला गेला का ??? एखाद्या संस्थाचालकांना वाचविण्याचे ते षडयंत्र होते का ?? असो,

सांगलीतील एका शाळेत एक 8 वी तील मुलगी घरातून शाळेत जातो म्हणून बाहेर पडली. तिची आई चविष्ट जेवण  तयार केले आहे म्हणून मुलीला द्यावे या उदात्त हेतूने शाळेत गेली.वर्गात तिला शोधले तर त्या आईला. "धक्काच"  बसला.कारण शाळेत जातो म्हणून बाहेर पडलेली त्यांची "परी" शाळेत आलीच नव्हती. याचा अर्थ ती कोणासोबत  तरी बाहेर गेली होती. ती आई बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत असताना त्या आईला घरी सोडण्यात आले. तिचीच "चुलत बहीण" ही त्याच शाळेत आहे.ती देखील शाळेतून गायब आहे. अशा घटना आईवडिलांच्या  "विश्वासाला"  तडा देणाऱ्या ठरतात.



तात्पर्य अल्पवयीन मुलींना "अमिश" दाखवून, प्रलोभन दाखवून फसवले जाते.त्यांचे लैंगिक शोषण केले जाते.त्यांचे आयुष्य.संपवले जाते. शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यपकांनी. दर महिन्यात एकदा सर्व मुलींना समोर बसवून फसवणूक होऊ नये म्हणून समुपदेशन  करने ही काळाची गरज बनली आहे.  आज मुलींच्या "अजाणपणाचा" गैरफायदा घेत राक्षसी. वृत्तिचे तरुण इवल्याश्या कळीला आज "कुस्करत" आहेत, व मुली त्यांना बळी  पडत आहेत. म्हणुनच " समुपदेशन" चे समाजप्रबोधन व्हायलाच  हवे. मुले कशाप्रकारे फसवतात, गोड बोलून प्रभावित करतात, महागड्या वस्तू , मोबाईल  भेट देतात, पैसे देतात, हे शिक्षकांनी वारंवार सांगायला हवे. मुलींच्या "कानावर" हे प्रबोधन  गेले तर काही प्रमाणात फसविण्याचा "षड्यंत्राला"  लगाम लागू शकतो.


    . *इकबाल बाबासाहेब  मुल्ला*

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा