Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ जानेवारी, २०२५

*शंकर नगर येथील सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना प्रथम ॲडव्हान्स प्रति मे टन रक्कम रुपये २८००/-प्रमाणे जाहीर*


 

*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे सिझन २०२४-२५ मध्ये २८ डिसेंबर २०२४ पासून गळीतास आलेल्या ऊसास प्रती मे.टन रक्कम रु.२,८००/- प्रमाणे प्रथम ॲडव्हान्स जाहिर करणेत येत असून दिपावली सणाकरीता रक्कम रु.१००/- असा एकुण रक्कम रु.२,९००/- प्रति मे.टन ऊस दर देण्यात येणार आहे.तसेच यापुर्वी जाहीर केलेप्रमाणे माहे-फेब्रुवारी २०२५ पासून पुढे गाळपास येणा-या ऊसाकरीता प्रति मे.टन रक्कम रु.१००/- अनुदान देण्यात येणार असून ते दिपावली सणाचे बिलाबरोबर अदा करणेत येणार असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली. 

          कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटीलस यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.कारखान्याचा सिझन २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम दिनांक १५/११/२०२४ रोजी सुरु झाला असून दि.३०/१२/ २०२४ अखेर ३ लाख ४७ हजार ५६३ मे.टन ऊसाचे गाळप होऊन ३ लाख १५ हजार ५०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून सरासरी साखर उतारा ९.८५% मिळाला आहे.सध्या प्रति दिवस ८००० मे.टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत आहे. चालू सिझन २०२४-२५ मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दिनांक ७/११/२०२४ रोजी सुरु झाला असून दि.३०/१२/२०२५ अखेर ३ कोटी ०८ लाख २७ हजार ६०० युनीट वीज निर्माण झाली असून त्यामधुन १ लाख ८८ लाख ९१ हजार ५०० युनिट वीज विक्री केलेली आहे.तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये दि.३०/१२/२०२४ अखेर सी व बी हेवी पासून ५० लाख ५९ हजार ११६ लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच ४५ लाख ५५ हजार ६७६ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. 

       यावेळी प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने- देशमुख,संचालिका,स्वरुपाराणी मोहिते-पाटील,तसेच संचालक लक्ष्मण शिंदे,सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे,विजयकुमार पवार,रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार,रामचंद्र सिद,विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे,महादेव क्षिरसागर,भिमराव काळे, अमरदिप काळकुटे,गोविंद पवार, सुभाष कटके,जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे,तज्ञ संचालक,  प्रकाशराव पाटील,रामचंद्रराव सावंत-पाटील,संचालिका सुजाता शिंदे,कार्यलक्षी संचालक - रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक-पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, कालीदास मिसाळ,दत्तात्रय चव्हाण,विनायक केचे,राजेंद्र भोसले,अमृतराज माने-देशमुख, धनंजय सावंत,नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे,अनिलराव कोकाटे,श्रीकांत बोडके, सौ.हर्षाली निंबाळकर,श्रीमती पुष्पा महाडीक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा