*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
सांगली : सरत्या वर्षात एकाच दिवशी पोलिस, शिक्षक आणि लिपिक असे तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. गुन्ह्यातील मदतीसाठी पोलिसाने २५ हजारांची लाच मागितली, तर महाविद्यालयातील थकीत पगार मंजुरीसाठी शिक्षक आणि लिपिकाने १ लाख १० हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे.
एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी लावलेल्या सापळ्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन पथकांनी एकापाठोपाठ दोन कारवाया करत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, प्रतीम चौगुले, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, सीमा माने, अजित पाटील, राधिका माने, पोपट पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा