*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
दारू नको ,दूध प्या, या संभाजी ब्रिगेडच्या उपक्रमास तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 31 डिसेंबर रोजी दारू पिणे ही जणू काय तरुणांमध्ये फॅशनच बनली आहे. त्यामुळे पुढे जाऊन तरुण व्यसनाधीन होतात आणि दारुमुळे आयुष्य बरबाद होते परिणामी कुटुंबाचं आणि देशाचा देखील नुकसान होतं. यामुळे "संभाजी ब्रिगेडचे - आनंद काशीद" यांच्या संकल्पनेतून मागील तीन वर्षापासून 31 डिसेंबर रोजी दारूच्या ऐवजी मोफत दुधाचा वाटप करून तरुणांना व्यसनमुक्त राहण्याचा संदेश आणि प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आनंद संभाजी ब्रिगेड ची पूर्ण टीम करत आहे त्या अनुषंगाने याही वर्षी दि. 31 डिसेंबर रोजी चा दूध वाटपाचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता परिक्षेत्रीय विभागीय पोलीस अधिकारी "जालिंदर नालकुल" यांच्या शुभहस्ते व बार्शी शहर पोलीस निरीक्षक 'बालाजी कुकडे' यांच्या उपस्थितीमध्ये श्री शिवाजी महाविद्यालयासमोरील प्रागणा समोर सुरुवात झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल म्हणाले की संभाजी ब्रिगेडने जो हा उपक्रम राबवत आहे तो अतिशय कौतुकास्पद आणि अभिनंदन असून तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्याचे कार्य करत आहे अशा प्रकारच्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा तर आहेतच परंतु इथून पुढच्या काळामध्ये अशा स्तुत्य उपक्रमामध्ये आम्ही ही रेल्वेने सहभागी होऊ असं यावेळी सांगितले. तर बार्शी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनी तरुणांना आजच्या काळात दिशा देण्याचे काम जर कोणी करत असेल तर सत्कार्य संभाजी ब्रिगेड करत आहे आणि हा उपक्रम देश हिताचे असून अशा कार्याची दखल इथून पुढच्या काळामध्ये समाज नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष- बालाजी डोईफोडे, विक्रम बापू घाईतिडक, रवींद्र मुठाळ, शोएब भाई सय्यद इंजिनिअर ,विनोद कुमार मिसाळ, दिगंबर रणखांब सचिन शिंदे आदींनी परिश्रम घेतले. तरुणांनो सावध व्हा..... दारू नको दूध प्या....... अशा घोषणांनी श्री शिवाजी महाविद्यालयाचा परिसर यावेळी दुमदुमून गेला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा