Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

*बारुळ येथील बाळेश्वर मंदिर प्रशालेने राज्यस्तरीय रौप्य पदक व मुख्यमंत्री "माझी शाळा सुंदर शाळा" उपक्रमात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक संपन्न*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

आज दिनांक -२३/०१/२०२५ रोजी बाळेश्वर मंदिर बारूळ येथे राज्यस्तरीय १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने राज्यस्तरावर रौप्य पदक मिलवल्याबद्दल खेळाडूंचा व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तुळजापूर तालुक्यात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सर्व  शिक्षकांचा,मुख्याध्यापक यांचा  बारुळ ग्रामस्थ,ग्रामपंचायत व शा.व्य.समिती बारूळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी खेळाडूंची ट्रॅक्टर मधून भव्य मिरवणूक कडण्यात आली. मिरवणूकित लेझिम पथक सहभागी झाले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्ह्याच्या पालक सचिव अंशु सिन्हा मॅडम ,धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मैनाक घोष साहेब,उप मुख्यकार्यकारी अधिकारी गोडभरले साहेब,प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील साहेब, सुरेश ठोंबरे (मा.मुख्याध्यापक जवाहर विद्यालय अणदूर),बळीराम कांबळे सरपंच वडगाव (सि),केंद्रप्रमुख श्रीहरी लोखंडे, डॉ.महेश गुरव,बाळासाहेब घेवारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शहाजी अण्णा सुपणार  होते.सुरुवातीला बाळेश्वर मंदिराचे पूजन करण्यात आले.त्यानंतर थ्रो बॉल खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सिन्हा मॅडम यांनी खेळाडूंना खेळाचे महत्त्व सांगितले.खेळामुळे होणारे  फायदे मुलांना मार्गदर्शन करून सांगितले.मैनाक घोष यांनी आयुष्यात खेळामुळे मुली कशा पुढे जातात ते मार्गदर्शन करून पुढे सुध्दा अशीच प्रगती करून राज्याचे नावलौकिक करावा असे सांगितले त्यानंतर सुरेश ठोंबरे सर यांनी खेळाडूंनी कशी सुरुवातीपासून खेळात प्रगती करून तालुका जिल्हा व राज्यस्तरावर नाव कमावले याचे सविस्तर माहिती दिली. क्रीडा प्रशिक्षक बालाजी पवार यांच्यामुळे बारूळ गावात खेळाचे वातावरण निर्माण होऊन मुले कशी पुढे जात आहेत याचेही महत्त्व सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे श्रेय ग्रामस्थानी उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे झाले. अशीच प्रत्येक गावात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये खेळाचे महत्व खेळाबद्दल वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी प्रगती करावी. कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता सतत मोठ्या पदावर जाण्याची इच्छा बाळगावी असे अशोक पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळा पाहणी करून पाटील साहेबांनी सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना शाळेच्या प्रगती बाबत खूप खूप शुभेच्छा दिल्या. शाळेच्या एकूण गुणवत्ता, प्रगती बाबत अतिशय समाधान व्यक्त केले. इयत्ता पहिलीच्या वर्गाची गुणवत्ता बाबत वर्गशिक्षिका गडेकर रूपाली  यांचे कौतुक केले.व शाळेचे पालकत्व स्वीकारून शाळेला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले. या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या एकूण वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा शाळेची प्रगती कशी साध्य केली, शाळा कशी पुढे नेताना काय काय केले याचे सर्व सविस्तर विवरण सौदागर शेख (मुख्याध्यापक) यांनी सुरुवातीला सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिन मुलाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश ठोंबरे सर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजसेवक नबी चाचा  शेख, संजय ठोंबरे, अनिल यावलकर , ग्रामसेवक भोसले साहेब,कमलाकर ठोंबरे,दत्तात्रय सगर, सरपंच शहाजी सुपणार, बाबू आप्पा ठोंबरे, शा.व्य.समिती अध्यक्ष मन्मथ ठोंबरे, उपाध्यक्ष सुधीर लांडगे, पोलीस पाटील सगर साहेब, उपसरपंच भास्कर सगट, महेश गुरव, क्रीडा शिक्षक बालाजी पवार ,नंदा मोरे, सरोजनी जाधव, कल्पना चव्हाण , प्रियदर्शनी शाळेचे मुख्याध्यापक अतुल माळी, सहशिक्षक अजित माळी,वैभव सगर मनीषा राजगुरू यांनी अतिशय परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा