*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
यशवंतनगर (सुमित्रानगर) येथील कु. साजिदा अब्दुलरशीद मुल्ला यांनी अन्न व औषध प्रशासन खात्याची अन्न सुरक्षा अधिकारी या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत झालेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्या शाळा, माळशिरस येथे पूर्ण झाले ,माध्यमिक शिक्षण लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर येथे पूर्ण झाले. उच्च माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय, अकलुज येथे पूर्ण झाले. पदवीचे शिक्षण छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयामध्ये कोल्हापुर येथे झालेअसून B.Sc. Agai मधून पूर्ण झाले. तसेच पदव्युत्तर शिक्षण (M.Sc. Agri) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथुन पूर्ण झाले. तिची अन्न व औषध प्रशासन खात्यात अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाल्याने सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे. साजिरा मुल्ला हि निवृत्त पोस्टमास्तर श्री. A.M. Mulla यांच्या कनिष्ठ कन्या आहेत.
तिच्या या निवडीबद्दल मुल्ला ,मुलाणी, पटेल, शेख परिवाराच्या वतीने
तसेच "टाइम्स 45 न्यूज मराठी"-- अकलूज ग्रुप घ्या वतीने हार्दिक शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा