*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
माळशिरस : माळशिरस तालुक्यातील अकलूजमधील नीरा नदीत येणाऱ्या व पुरंदावडे गावच्या हद्दीत असलेल्या ओढ्यात येणाऱ्या दूषित पाण्याचा शोध घेवून व चौकशी करून दूषित पाणी सोडणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,जिल्हाधिकारी सोलापूर,उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी सोलापूर यांना निवेदन दिले आहे.दूषित पाणी सोडणाऱ्यावर त्वरित कारवाई न केल्यास दिनांक ०४/०२/२०२५ रोजी अकलूजमधील साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर बेमुदत ठिय्या व थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा,पालकमंत्री,जिल्हाधिकारी,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांना दिला आहे.
माळशिरस तालुक्यातील शिवतेजनगर,प्रतापसिंह चौक,व्यकंटनगर,अकलाईनगर,मार्गे थेट अकलूजमधील नीरा नदीत दूषित पाणी सोडले जात आहे,त्यामुळे नदी काठच्या जनतेला दूषित पाण्याच्या वासामुळे तसेच सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे,नदी काठच्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दुषित पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि पुरंदावडे ते इस्लामपूर रस्त्यावर असलेल्या पुरंदावडे हद्दीतील ओढ्यातून येणारे दूषित पाणी येळीव हद्दीत असलेल्या ओढ्यामध्ये येत असून दूषित पाण्याच्या वासामुळे पुरंदावडे गावातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे व गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नदीच्या व ओढ्याच्या जलप्रदूषणामुळे संगम होणाऱ्या पुढच्या सर्व नद्या व ओढ्याच्या काठावर असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,तसेच संगम होणाऱ्या नद्या व ओढ्याचे पाणी वापरणाऱ्यांनाही त्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे पुरंदावडे व अकलूजमधील नीरा नदीत पाणी सोडणाऱ्याचा शोध घेवून व चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे नीरा (माई ) नदी बचाव साठी ४ फेब्रुवारी २०२५ पासून अकलूजमधील साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर बेमुदत ठिय्या व थाळीनाद आंदोलन करणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा