Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

*विजयवाडी ग्रामपंचायत च्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन व नुतन खासदार व आमदार यांचा सत्कार समारंभाचे आयोजन*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

विजयवाडी (ता.माळशिरस) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन व नूतन खासदार व आमदार यांच्या सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.१९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे.

             महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मदनसिंह मोहिते-पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील‌,आमदार उत्तमराव जानकर,माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते- पाटील,गटविकास अधिकारी आबासाहेब पवार,माळशिरस उपविभाग ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता सौ.टी.एन.हुन्नरे मॅडम, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे,शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.ए.बी, आव्हाड यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे विजयवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा