Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

*माळशिरस पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता ६०००० रुपयाचे लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो च्या जाळ्यात?*

 


*सोलापूर--- प्रतिनिधी*

*आबिद बागवान*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या इलेक्ट्रिक कामाचे बिल मंजूर करण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात एक लाखाची लाच मागून 60000 रुपये घेताना माळशिरस पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शशिकांत सयाजी चौगुले, पद कनिष्ठ अभियंता, तालुका पंचायत समिती, माळशिरस, जि. सोलापूर, (वर्ग-३) असे त्या अभियंत्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे शासकिय इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठीचा शासकीय परवाना असून, त्यासाठी त्यांनी एक फर्म स्थापन केली आहे. या फर्मद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणारी सर्व प्रकारची इलेक्ट्रिक कामे करण्यात येत असतात. या फर्मला मिळणारी शासकीय इलेक्ट्रिक कामे करण्यासाठी तसेच केलेल्या कामाच्या बिलासाठीचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीने तक्रारदाराला अधिकारपत्र दिलेले आहे.


तक्रारदाराने फर्मच्या वतीने फळवणी ग्रामपंचायत, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे शासकिय इलेक्ट्रीक काम पूर्ण केलेले आहे. त्याबाबतचे विल त्यांना मिळाले आहे. तसेच त्यांनी पिलीव ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या रोडलाईटच्या कामाच्या बिलाच्या अनुषंगाने पाठपुरावा करत असताना तक्रारदार हे यातील लोकसेवक शशिकांत चौगुले, कनिष्ठ अभियंता यांचेकडे गेले असता त्यांनी तक्रारदाराकडे फळपणी ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामाचे बिल मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात ३४,००० रुपये व पिलीव ग्रामपंचायत हदीत केलेल्या कामाच्या विलासाठी करत असलेल्या मदतीच्या मोबदल्यात ३३,००० रुपये असे एकूण ६७,००० रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली आहे.

सदर तक्रारदार यांच्या प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक शशिकांत चौगुले यांनी तक्रारदार यांनी केलेल्या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीत केलेल्या इलेक्ट्रिकल कामाचे बील मंजुरीसाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात तरोच तक्रारदाराने इतरत्र केलेल्या कामाचे बील भविष्यात मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे १,००,००० रुपयांच्या लाचेची मागणी करून, आज रोजी लोकसेवक शशिकांत चौगुले यांनी तक्रारदार यांचेकडून एकुण लाच मागणी रकमेपैकी ५०,०००/- (पन्नास हजार) रुपये पंचायत समिती कार्यालय, माळशिरस, जि. सोलापूर याठिकाणी स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, लोकसेवक शशिकांत चौगुले यांचेविरुद्ध माळशिरस पोलीस स्टेशन, सोलापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ घे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा