Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेचे नेते "महेश कोठे' यांचा प्रयागराज येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*

 


*टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज

सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर, ज्येष्ठ नेते महेशअण्णा कोठे यांचे हृदयविकाराचे झटक्याने निधन झाले. प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी गेल्यानंतर महेशअण्णा यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे.


आमदार होण्याचे आणि सोलापुरात आयटी पार्क उभारण्याचे महेश अण्णा कोठे यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्यानंतर महेश कोठे यांनी सोलापुरात आपला राजकीय धबधबा निर्माण केला होता. गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.


अनेक निवडणुका महेश कोठे यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या गेल्या. आधी काँग्रेसमध्ये त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि मग त्यानंतर सध्या ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते.

त्यांचा अंत्यविधी सोलापूर येथे होणार असल्याचे समजते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा