*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
मोटार सायकल अपघातात ६८ टक्के व्यक्तीचा मृत्यू हा डोक्याला दुखापत होत असून दुचाकी चालकांनी दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचे मोटार वाहन निरीक्षक सचिन झाडबुके यांनी दुचाकी चालकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज याच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दुचाकी चालकासाठी हेल्मेट जनजागृती अभियान राबविण्यात येत असून आज माळशिरस बस स्थानक नजीक मोटार सायकल चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी वैभव राऊत,अक्षय पोमण, प्रशांत गावडे,चालक झनझन, कांबळे आदी उपस्थित होते.या उपक्रमास श्रीराम शिक्षण संस्था पानीवचे प्राचार्य नलावडे सर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले .
यावेळी दुचाकी वाहनाच्या अपघाता बाबत बोलताना ते म्हणाले मोटार सायकल अपघात हे अतिवेगाने दुचाकी चालविणे,नागमोडी वळणे घेत दुचाकी चालविणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे,दुचाकी चालविताना मोबाईल वापरणे,मद्यप्राशन करून दुचाकी चालविणे,दुचाकी विरुध्द दिशेने चालविणे,हाताचे अथवा इंडिकेटर इशारे योग्य वेळी न देता अचानकपणे वाहन वळविणे यामुळे होतात.यासठी चालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.वाहन चालविताना दुचाकीचा वेग ५० कि.मी पेक्षा अधिक नसावा, वाहन चालविताना मोबाईल वापरू नये,दुचाकीवर केवळ दोन व्यक्तींना प्रवास करण्याची परवानगी आहे.अधिक व्यक्ती बसविल्यास चालकास योग्य ठिकाणी बसता न आल्याने वाहनावर नियंत्रण रहात नाही व अपघात होतात,वाहनाचे आरसे काढू नयेत आरसे नसल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा योग्य वेळी अंदाज न आल्याने अपघात होतो,त्याच बरोबर दुचाकी वाहनाचे लाईटस सुस्थित असावेत.समोरून वाहन येत असताना ओव्हरटेक करू नये तसेच डाव्या बाजूने ओव्हरटेक करू नये,वळण रस्तावर ओव्हरटेक करू नये याबाबतचे मार्गदर्शन झाडबुके यांनी केले.हा उपक्रम टेंभुर्णी,पानीव,
माळशिरस येथे राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा