*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
माळीनगर (ता. माळशिरस ) आणि
माळीनगर परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेती पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन हा एक उत्तम पर्याय व काळाची गरज याबाबत अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी ग्रामीण भागामध्ये जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2024 -25 अंतर्गत माळीनगर येथे मधुमक्षिका पालन एक कृषीपूरक व्यवसाय या विषयावर कृषीकन्यामार्फत चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्र दरम्यान गावातील शेतकरी ,बंधू-भगिनी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .या चर्चासत्राचा प्रमुख उद्देश मधुमक्षिका बद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करणे आणि मधुमक्षिका पालन उद्योग संदर्भात जनजागृती करणे हा होय .
हे चर्चासत्र आयोजित कृषी कन्यांना रत्नाई कृषी महाविद्यालय प्राचार्य आर.जी. नलवडे ,कार्यक्रम समन्वयक प्रा.एस. एम.एकतपुरे कार्यक्रमाधिकारी
प्रा. एम .एम .चंदनकर व प्रा. एच .व्ही .खराडे व विषय तज्ञ
प्रा. डी .पी. बरकडे (कीटकशास्त्र विभाग) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
चर्चासत्र दरम्यान विषयास अनुसरून माहिती देण्याचे तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्याचे काम कृषी कन्या प्रतीक्षा हेगडे, प्राची जाधव, ईशा घोगरे ,स्नेहल तांबोळकर ,सोनाली गायकवाड, प्रणाली यादव ,प्रतीक्षा बनसोडे ,कोमल लाड, जिजाऊ बरडे यांनी केले. चर्चासत्रास शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा