Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

*तक्रारवाडी येथील मागासवर्गीय समाजाच्या रस्ता अतिक्रमण विरोधात पेपर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन* *आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण* *रात्रीत काढले परंतु अतिक्रमण करणाऱ्या वर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी रास्ता रोको*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मौजे तक्रारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील मागासवर्गीय वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर काही समाजकंटकांनी अतिक्रमण करून आडवला होता याबाबतची तक्रार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटी भाऊ सोनवणे यांच्याकडे आल्यानंतर सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढून मागासवर्गीय समाजाच्या रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या समाजकंटकांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करणेबाबतचे निवेदन विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी पुणे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचेसह संबंधित अधिकाऱ्यांना देऊन बुधवार 22 जानेवारी 2025 रोजी भिगवन राशीन रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर प्रशासनाने आंदोलनाच्या एक दिवस रात्री म्हणजेच मंगळवार 21 जानेवारी रोजी रात्री सदरच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढले परंतु मागासवर्गीय समाजाच्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या संबंधित समाजकंटकांवर ॲट्रॉसिटी एक्टनुसार गुन्हा दाखल न केल्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये व महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भिगवन राशीन रस्त्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदरच्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था पूर्ण खोळंबली होती व वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी रास्ता रोको करून महापुरुषांच्या घोषणा देऊन सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या समाजकंटकांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटी भाऊ सोनवणे सचिन आढाव यांनी भाषणे करून समाजकंटकांवर ॲट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यास आणखी तीन दिवसाचा वेळ प्रशासनाला दिला अन्यथा 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालय इंदापूर समोर हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला 



यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे बारामती तालुकाध्यक्ष आनंदभाऊ लोंढे इंदापूर तालुका प्रभारी संतोष गायकवाड माळशिरस तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब ननवरे संघटक विकी लोंढे दत्ता थोरात तक्रारवाडीचे माजी सरपंच अण्णासाहेब आढाव माजी सरपंच सतीश वाघ पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई आढाव तक्रारवाडी ग्रामपंचायत सदस्य नितीन काळंगे कुंभारगावचे ग्रामपंचायत सदस्य स्वप्निलभैय्या लोंढे कुंभारगावचे माजी सरपंच भगवान दादा लोंढे गोट्याभाऊ क्षीरसागर भिगवनचे युवा नेते वैभवशेठ आढाव डॉ.बाळासाहेब भोसले पप्पू कलानी राशनचे युवानेते कमलेश भाऊ साळवे युवा नेते प्रमोदभाऊ चव्हाण वर्धमानभैया पिसे सामाजिक कार्यकर्ते जनार्धन खरे घोरपडवाडीचे माजी सरपंच अमोल कांबळे सामाजिक कार्यकर्ते अरविंद मखरे दीपक चव्हाण अजय मखरे रोहित मोहिते भाऊसाहेब वाघ रजनीकांत लोंढे शुभम मखरे बबलू मखरे आशिष गायकवाड अक्षयभैय्या जोगदंड श्रीनिवास शेलार अनिल वाघ बंटी कांबळे युवा नेते खेड भैय्यासाहेब झेंडे सतीश आढाव रोहित भैया शेलार योगेश जगताप बापू भोसले गुलाबभैय्या मिसाळ नितीन घनवट मोन्या मखरे सम्यक मखरे योगेश मखरे विकी खरे विशाल बनसोडे राहुल जाधव यांचेसह बंटीभाऊ सोनवणे मित्रपरिवार व बी एस ग्रुप इंदापूरचे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा