Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

*काक्रंबा ता.तुळजापूर येथील जि. प. शाळेत "बाळासाहेब ठाकरे" जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज काक्रंबा शिवसैनिकांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली शिवसेनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या वाक्यानुसार दरवर्षीप्रमाणे जयंती साजरी केली शिवसेना युवानेते चेतन भाऊ बंडगर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे जीवनशैली वर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या वेळेस शाळेतील विद्यार्थ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल अतिशय सुंदर सुरेख भाषण केले यावेळेस स्पर्धेत तीन क्रमांक काढण्यात आले यावेळी व त्यांना शालेय साहित्याचे बक्षीस देण्यात आले यावेळी 

प्रथम क्रमांक. मिसबा फरीद शेख

द्वितीय क्रमांक आनंदी दयानंद वाघमारे 

तृतीय क्रमांक मंगेश रणजित कोरे

उत्तेजनार्थ बक्षीस श्लोक चंद्रोदन कोरे



या विद्यार्थ्यांनी पटकावला तसेच इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुरेख पद्धतीने भाषण केले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष किशोर सोनवणे उपाध्यक्ष सुजित कोरे शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर कालिदास सुरवसे दीपक भिसे दयानंद वाघमारे श्याम सुरवसे कार्तिक वाघमारे बालाजी गोडसे वासुदेव भालेराव शिवराज बचाटे नामदेव झाडे सतीश माने पत्रकार राम थोरात अहमद अन्सारी सर्व शिक्षक कर्मचारी वृंद व शालेय शिक्षण समिती सर्व सदस्य, शिवसैनिक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा