*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
आपल्या शाळेतील केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी पोस्टाद्वारे केंद्रशासन निर्मित माहिती अधिकार अर्ज घेण्यास नकार देणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जनमाहिती अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना शासकिय कामात कसूर केल्याप्रकरणी तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी माहिती अधिकार चा कार्यकर्ता सय्यद फजल यांनी१) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय धाराशिव २) शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव,३) गटशिक्षणाधिकारी गटशिक्षण कार्यालयौ तुळजापूर / उमरगा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
वरील विषयास अनुसरून तक्रार दाखल करतो की, मी तुळजापूर व उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक मुख्यालयी राहत असल्या विषयाबद्दलची माहिती मागविण्यासाठी माहिती अधिकार अर्जाचा वापर करून पोस्टाद्वारे माहिती अधिकार अर्ज पाठविले होते. परंतु जिल्हा परिषद शाळेतील जनमाहिती अधिकारी यांनी मी पाठविलेला माहिती अधिकार अर्ज घेण्यास नकार देवून ते परत पाठविले. यावरून असे दिसून येते की, आपापल्या शाळेतील जनमाहिती अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी व माहिती अधिकारात मागण्यात आलेली माहिती देण्याचे टाळण्यासाठी संबंधीताने माहिती अधिकार अर्ज घेण्यास नकार दिले व केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी माहिती अधिकार घेतलेला नाही अशी शंका निर्माण होते व संबंधीत जिल्हा परिषद शाळेतील सर्व कामाची व पोषण आहार, मुख्यालयी राहतेत किंवा नाही याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. सबंधीत जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक-केंमा अर्ज- 2007/74/प्रक्र/154/07/06 मंत्रालय मुंबई दि.31/03/2008 या शासन परित्रकानुसार कारवाई करणे. वरील कार्यपद्धतीचे अनुपालन न करता अर्जदारास त्रास होईल अशी वर्तवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याविरूध्द आपल्या कार्यालयातील प्रमुखानी तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करून निलंबनाची कठोर कारवाई करून त्यांच्या कामाची सर्व प्रकारची चौकशी करण्याबाबतचे आदेश पारीत करावे अशी ही मागणी निवेदनात केले आहे मागणी केलेले
संबंधीत शाळेचे नाव आणि गाव पुढील प्रमाणे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अपसिंगा ता. तुळजापूर
३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तीर्थ ता.तुळजापूर
४) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाळिंब -ता. उमरगा
सय्य्द मिज फजल अध्यक्ष त्याचार विरोधी समिती अन्याय अत्याचार अल्पसंख्याक विभाग, उस्मानाबाद शाखा, नळदुर्ग ता. तुळजापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा