*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
शासनाने मागासवर्गीय कुटूंबियांना दिलेल्या कबाला जागेवर अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी याची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून शासकिय जागा अतिक्रमण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माहिती अधिकार चा कार्यकर्ता सय्यद अजित फजल यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे नियोदनाद्वारे केली आहे
याबाबत निवेदनाद्वारे केलेली सविस्तर माहिती
निवेदनाद्वारे तक्रार देतो की, मौजे. कनगरा ता. जि. धाराशिव येथील रहिवाशी स्वर्गीय दुर्गाप्पा तिमण्णा माने यांना तहसीलदार उस्मानाबाद यांनी सन 1883 साली राहण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून कबाला जागा कायमस्वरूपी म्हणून दिली होती. सदरील व्यक्ती आपला व आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करण्यासाठी परगावी गेले होते. गावातील कांही लोकांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून मागासवर्गीय कुटुंबियाला दिलेल्या कबाला जागेवर अतिक्रमण करून ताब्यात घेतले आहे. ज्यावेळेस वरील मागासवर्गीय कुटुंब आपल्या गावी परत आल्यानंतर त्या जागेवर गेले असता त्या कबाला जागेवर उकिरडा केल्याचे दिसून आले. या जागेबद्दल ग्रामपंचायतीमध्ये जावून वारंवार जाऊन विचारणा केली असता गावातील कांही गुंड प्रवृत्तीचे लोक ग्रामपंचायतीमध्ये येवून ग्रामसेवकाच्या समोर त्या लोकांनी अश्लील भाषा वापरून अरेरावी करून शिवीगाळ केली. त्या कुटुंबियांनी याची तक्रार वरिष्ठाकडे केली असता संबंधित पंचायत समितीचे मा. गटविकास अधिकारी यांनी या विषयावर बोलण्यास तयार नाहीत त्या कवाला जागेचे मा. गटविकास अधिकारी यांना कागदपत्रे दाखवून देखील त्यांनी हे प्रकरण माझ्याकडे येत नाही तुम्ही संबंधित कार्यालयाकडे संपर्क साधा असे सांगितले. तसेच यानंतर कबाला धारकाचे वारस यांनी मा. ग्रामसेवक यांच्याकडे याविषयाबद्दल लेखी तक्रार करून देखील त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्या कबाला जागेवर पत्र्याचे शेड मारून दुकान गाळे तयार केले आहेत. शासनाच्या नियामानुसार शासनाने दिलेल्या जागेवर कोणीही अतिक्रमण करून शकत नाही किंवा त्या जागेचा गैरवापर केला जावू शकत नाही. तरीदेखील शासनाच्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून त्या मागासवर्गीय कुटुंबियाला दिलेल्या कबाला जागेवर अतिक्रमण करून ती जागा हडप केली आहे. अश्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होवून शासनाच्या नियामाप्रमाणे त्याच्यावर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. या ग्रामसेवकांनी कनगरा गावात किती कबाला जागेवर अतिक्रमण केले याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे जेणेकरून कवाला धारकाची शासनाने दिलेल्या जागेवर स्वतःचे घर होईल. वरील कुटुंब निराश होवून त्यांनी आमच्या अन्याय अत्याचार विरोधी समिती कडे न्याय मिळवून देण्यासाठी विनंती पत्र दिलेले आहे. त्या पत्रावरून व त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रावरून असे दिसून येते त्या मागासवर्गीय कुटुंबियावर अन्याय झाल्याचे स्पष्ट दिसून येते. आपणाला कळकळीची विनंती की, वरील मागासवर्गीय कुटुंबियावर झालेला अन्याय हे आपल्या कार्यालयामार्फत न्याय मिळवून देण्यात यावे व संबंधित अधिकारी व गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर देखील गुन्हे दाखल करण्याचे आदेशीत करण्यात यावे अशी मागणी नियोजनातून केली आहे
की
माहितीस्तव हे निवेदन खालील अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत
१) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय -धाराशिव
२) उपविभागीय अधिकारी-- उपविभागीय कार्यालय धाराशिव
३) तहसीलदार तहसील- कार्यालय धाराशिव
सोबत :- कनगरा गावातील मागासवर्गीय कुटुंबाकडे कबाला जागेचे उपलब्ध कागदपत्रे.
सय्यद आजिज फजल
अध्यक्ष अन्याय अत्याचार विरोधी समिती
अल्पसंख्याक विभाग, उस्मानाबाद शाखा, नळदुर्ग ता. तुळजापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा