Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

*धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी यांची पगार वेळेवर होत नसले बाबत. व महिन्याच्या एक तारखेला पगार करणे या मागणीबाबत जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वतीने शिंगोली धाराशिव आश्रम शाळेतील शिक्षक सतीश शहाजी कुंभार यांनी राज्याचे मुख्यमंत्री -देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले आहे त्या निवेदनात नमूद केलेल्या मागण्या आणि वृत्तांत खालील प्रमाणे

वरील विषयास अनुसरून निवेदन करतो की, तांडयावर, दुर्गम भागात ज्ञान देण्याचे अध्यापन करण्याचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षक व कर्मचारी यांचे दरमहा 1 तारखेला वेतन होणे अत्यंत महत्वाचे आहे.

पतसंस्था, गृहकर्ज, वाढती महागाई यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे एक तारखेला वेतन होणे अत्यंत आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकार मार्फत भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जाती तसेच इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने तांडा, वस्ती, वाडी तसेच दुर्गभ भागात आश्रम शाळा सुरू करण्यात आले आहेत व तसेच धाराशिव जिल्हयामध्ये ही आश्रमशाळा चालू आहेत. सदर आश्रमशाळेमधील शिक्षक व कर्मचारी यांचे मासिक पगार हा वेळेवर होत नसल्यामुळे जिल्हयातील आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचे आर्थीक नियोजन बिघडत आहे. यामुळे शिक्षक व कर्मचारी यांनी इतर बँकेकडून, पतसंस्था इ. कडून घेतलेले कर्ज, वेळोवर हाप्ता न गेल्यामुळे त्या कर्जाच्या दंडास विना कारण दंड बसत आहे त्यामुळे शिक्षक व कर्मचारी यांचे आर्थीक सिबील खराब होत आहे. तसेच सद्या या महिन्यात मकर संक्रांत हा सन झालेला असून आज दि. 15/01/2025 रोजी पर्यंत आम्हा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार शासनाने केलेली नाही. यामुळे आमचे घरातील आर्थीक नियोजन खोळंबले आहे व सर्व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तसेच घराचे जिल्ह्यामध्ये एकूण 38 आश्रम शाळा असून त्यामध्ये 2000 कर्मचारी सेवेत आहे 

तरी आपणास सर्व आश्रम शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे की आम्हास सर्वोच  कर्मचाऱ्यांचे प्रत्येक महिन्याच्या 1  तारखेपर्यंत पगार करावा व तसेच मागील महिन्याचे पगार लवकरात लवकर शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर त्यांचा मासिक पगार वर्ग करावा शिवाय या मागणीसाठी दिनांक 17 फेब्रुवारी 2025 व दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचारी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहे तरी आपण गांभीर्याने याची दखल घ्यावी अशी विनंती या निवेदनात केली आहे 




माहितीस्तव व योग्य त्या कारवाई स्तव या नियोजनाची प्रत खालील मान्यवरांना देण्यात आली आहे 


1) अतुल सावे- इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई .

2) प्रधान सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई 32 .

3) इतर मागास बहुजन कल्याण संचनालय तीन चर्चेत पुणे महाराष्ट्र राज्य .

4) खासदार- ओमप्रकाश राजे निंबाळकर धाराशिव .

5) शिक्षक आमदार -विक्रम काळे मराठवाडा शिक्षक मतदार संघ संभाजीनगर .

6) आमदार- कैलास बाळासाहेब घाडगे पाटील उस्मानाबाद कळंब

7) प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग लातूर .

8) सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग धाराशिव .


सोबत प्रति 

1) खासदार ओम प्रकाश राज निंबाळकर यांचे दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी चे पत्र 

2) दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजीचा आपणास दिलेला आज 

3) दिनांक 24 जून 2024 रोजी आपणास दिलेला अर्ज जोडलेला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा