Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

स्वयंसहाय्यता महिला बचत गट चालवणार स्वस्त धान्य दुकान.

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

गणेशगाव (ता.माळशिरस) येथील जिजामाता स्वयंसहाय्यता बचत गट अध्यक्षा सुरेखा नलवडे उपाध्यक्षा स्वाती मोरे यांचे बचत गटाने स्वस्त धान्य दुकान सुरू केल्यामुळे महिला वर्गातून आनंदाचे वातावरण पसरले आहे.या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

           या प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुरेखा नलवडे म्हणाल्या की,जिजामाता स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने आज सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान सुरू केल्यामुळे आता महिलांना रेशनकार्डवरील मिळणारे धान्य सर्वांना वेळच्या वेळी मिळणार आहे.गणेशगांव येथील महिलांनी अजून एका क्षेत्रात प्रगतीचे पाऊल टाकले आहे.



       या कार्यक्रमाला गणेशगावचे सरपंच सदाशिव शेंडगे, उपसरपंच बाळू ठोकळे,माजी सरपंच शोभा विठ्ठल नलवडे,उषा रामचंद्र ठोंबरे,ग्रामसेविका लता घुले,पोलीस पाटील भाईसाब शेख,दादासाहेब नलवडे,विशाल नलवडे,दत्तात्रय मोरे,बालम शेख कुंडलिक शेंडगे,कामिनी ताटे संयोगिनी मनीषा जाधव,वर्षा ठोकळे,गजानन लिगाडे,जावेद शेख,संतोष नलवडे,लाला पानसरे,लाला शेंडगे,उद्धव शेंडगे, गावातील सर्व बचत गततील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा