*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळशिरस तालुक्यातील कोंडबावी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी
.मंजुषा मिलिंद रेडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.कोंडबावी ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची जागा रिक्त झाल्याने सदर जागेसाठी आज निवड प्रक्रिया पार पडली.त्यात .मंजुषा मिलिंद रेडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सदरची निवड ग्रामपंचायतीच्या सरपंच .प्रियंका विजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवडणूक निरीक्षक म्हणून माळशिरस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.एम.सरवदे तसेच या निवडणुक प्रक्रियेत कोंडबावी ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी श्रीमती बी.के. कारंजकर मॅडम यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शन विष्णुपंत घाडगे, ग्रामपंचायतीचे सदस्य दादा कृष्णा यादव,वर्षा अनिल माने,अंकुश संभाजी साठे,तसेच ग्रामस्थ ज्ञानदेव रेडेकर,नवनाथ माने,अनिल माने,आप्पा घाडगे, नामदेव रेडेकर,सुरेश माने,विष्णु मगर,मिलिंद रेडेकर,शिवाजी नामदास,सोमनाथ वाघमोडे, विजय रेडेकर उपस्थित होते. कोंडबावी गावचे हवालदार .राऊत साहेब,गावचे पोलीस पाटील सचिन माने पाटील यांनी सदरच्या निवड प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी अथ्थक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा