*सोलापूर -----प्रतिनिधी*
*आबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापूर येथे डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा संपन्न झाला याप्रसंगी. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रणितीताई शिंदे उपस्थित होत्या
यावेळी खासदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या प्रलंबित मागण्या पेन्शन लागू करा, मानधन नको दरमहा वेतन द्या, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना कायम करा आणि ग्रॅच्युइटी द्या अशा विविध प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत एक बहिणीच्या नात्याने अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, सोडवण्यासाठी व त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संसदेत आणि राज्य सरकारकडे पूर्ण ताकदीने आवाज उठविणार असल्याचे सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा