*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी
-टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
-----जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लुमेवाडी येथील आदर्श, उपक्रमशील शिक्षिका डॉ. उषा भोईटे पवार यांचा शोधनिबंध अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या 32 व्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी सादर केला. तसेच ISSN नामांकन प्राप्त international Journal of advance and applied research पुस्तकात तो प्रकाशित झाला.
सदर राष्ट्रीय अधिवेशन सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय, केडगाव, (ता. दौंड) येथे नुकतेच संपन्न झाले. "महात्मा गांधी कार्यकर्तृत्व, विचार व वारसा"या विषयावर सदर शोधनिबंध सादर करण्यात आला. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या सत्राध्यक्षा डॉ.मंजुश्री पवार होत्या. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.बी.डी.कुलकर्णी, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अध्यक्ष डॉ.अरुणा मोरे तसेच महाराष्ट्रातून आलेले सर्व प्राध्यापक, इतिहास संशोधक, विध्यार्थी यावेळी उपस्थित होते. आजपर्यंत डॉ. उषा भोईटे यांचे १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. इंदापूर तालुक्यातील सर्व शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. इंदापूर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित होणाऱ्या त्या एकमेव प्राथमिक शिक्षिका आहेत.
फोटो - डॉ. उषा भोईटे पवार
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा