*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे युथ फॉर माय भारत व डिजीटल साक्षरतेसाठी युवक या उद्देशाने विशेष श्रमसंस्कार शिबीर उघडेवाडी (ता.माळशिरस) येथे दि.१५ ते २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते.आज समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरसच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर होते.
मार्गदर्शन करताना विजया पांगारकर पुढे म्हणाल्या की,श्रम करताना अहंकार गळून पडतो तर सेवाभाव जोपासला तर आपल्याकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढणार नाही असे विचार व्यक्त केले.श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थींना यशस्वी जीवनाचा अनुभव येतो व त्यातून चांगला माणूस घडतो.आयुष्यात पुढे येण्यासाठी विविध अनुभव उपयोगी पडतात.आपण समाजात मिसळल्या शिवाय समाजाचे प्रश्न आपणास समजू शकणार नाहीत.असे मत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करताना म्हणाले की,विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास हा केवळ चार भिंतीच्या आतील शिक्षणाने होत नाही तर बाह्य जगातील अनुभव सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात.
यावेळी व्यासपीठावर उघडेवाडीचे सरपंच सौ. जिजाबाई गवळी,उपसरपंच सौ. अंजली सस्ते,ज्येष्ठ नेते अजितसिंह माने देशमुख,रविंद्र घोरपडे,तानाजीराव जगदाळे, सयाजीराव उघडे,मोहनराव कचरे,पांडुरंग कदम,नितीन चौगुले,महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार प्राप्त डॉ.बाळासाहेब मुळीक,अरविंद शेंडगे,प्रा.चंकेश्वर लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये मशाल फेरी,ग्राम स्वच्छता,वृक्षदिंडी, वृक्षारोपण,स्मशानभूमीतील स्वच्छता व काटेरी झुडपांचे निर्मूलन,प्राथमिक शाळेतील परसबाग उभारणीसाठी पूर्वतयारी,क्रीडांगणावरील झुडपांचे निर्मूलन व मैदान सफाई,पथनाट्यातून समाज प्रबोधन पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ.लक्ष्मण आसबे यांचे युवकांना प्रबोधन करणारे व्याख्यान,संमोहन तज्ञ क्रांतीदीप लोंढे यांचे संमोहनाचे उपचारासाठी उपयोग यावरील प्रयोग,प्रा.धनंजय देशमुख यांचे व्यसनमुक्ती वरील व्याख्यान, जादूगार शालीमार यांचे मनोरंजनातून जादू व अंधश्रद्धा निर्मूलन यावरील प्रयोग,प्रा. विक्रमसिंह मगर यांचे डिजिटल साक्षरते संदर्भात व्याख्यान,डॉ. किरण महाराज बोधले यांचे प्रबोधन पर किर्तन,प्रा.तुकाराम म्हस्के यांचे प्रबोधनपर व्याख्यान,ह.भ.प.महादेव महाराज शेंडे यांचे प्रबोधनपर एकनाथी सोंगी भारुड,महिला मेळावा,आरोग्य शिबिर, पशुचिकित्सा शिबिर आदी कार्यक्रमांना गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाधिकारी प्रा.दत्तात्रय मगर यांनी शिबिर कालखंडात पार पडलेल्या कामाचा आढावा घेतला,प्रा. सज्जन पवार यांनी आभार मानले.प्रा.विजयकुमार शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.हे शिबीर यशस्वी पार पडण्यासाठी कार्यक्रम अधिकारी.प्रा.सौ.स्मिता पाटील,प्रा.बलभीम काकुळे, प्रा.तानाजी बावळे व शिबीरार्थी विद्यार्थी यांनी खूप परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा