*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
"चेअरमन केसरी ' युवा उद्योजक ऋषी भैय्या शिंदे यांनी भव्य अशी आदत बैलगाडी शर्यत 26 जानेवारी रोजी आयोजित केले आहे. कुडाळ सावंतवाडी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. भव्य आदत बैलगाडी शर्यत भव्य बैलगाडी शर्यंत जास्तीत जास्त अधुनिक साधनांचा वापर करून पारदर्शकरित्या पार पाडली जाईल. या शर्यतीसाठी मैदानाची आदर्शवत रूपरेषा तयार केलेली आहे.
बैलगाडी शर्यत म्हणजे भव्य आदत बैलगाडी शर्यत 2025 कुडाळ (सावंतवाडी) येथे आयोजित करण्यात आले आहे. या शर्यतीमध्ये यशस्वी ठरलेल्या बैलांची किंमत लाखोंच्या घरात होत असते. याचा आर्थिक फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत असतो. त्यामुळे बहुतांश बैल मालक बक्षीसाच्या रकमेला महत्व न देता मैदानात आपला बैल पळावा यासाठी अग्रेसर असतात.
भिर्रर्रर्रर्र .....बैलगाडी मैदानात आली की शिट्टीचा आवाज येत असतो.भिर्रर्रर्रर्र ...... एकदा का मैदानात एक किंवा दोन फेऱ्या जिंकणारे बैल सुद्धा नावारूपाला येतात . त्यामुळे शेतकरी तसेच बैलगाडी शर्यत शोकिनांचा शर्यतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
कोणती बैलगाडी चेअरमन केसरी गाजविणार ..... याची शर्यत शौकिनांना उत्सुकता शिगेला लागलेली आहे.
बैलगाडी क्षेत्राला चांगली दिशा देणारे युवा उद्योजक ऋषी भैया शिंदे यांनी भव्य आदत बैलगाडी शर्यत 2025 कुडाळ सावंतवाडी येथे 26 जानेवारी रोजी भरवण्यात आली आहे मोठ्या संख्येने भव्य आदत बैलगाडी आयोजन करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने भव्य आदत बैलगाडी शर्यतीला बैलगाडी शौकिनांनी आणि उपस्थित रहावे असे आव्हान देखील ऋषी शिंदे यांनी केले आहे.
महादेव शिंदे म्हणाले, बैलगाडी शर्यत शौकिनांनी सहभागी व्हावे . आज-काल युवक वर्ग व्यसनाधी न होण्यापेक्षा बैलगाडी क्षेत्रात युवक वर्ग मोठ्या संख्येने भाग घ्यावे . असे आव्हान करण्यात आले आहे
कॉलम - चेअरमन केसरी भव्य आदत बैलगाडी शर्यत कुडाळ (सावंतवाडी) येथे आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी स्वीकारण्यात येणार आहे. नोंदणी 21/01/2025 ते 25/01/2025 स्वीकारण्यात येणार आहे . आयोजक लंबोदर फॅन्स क्लब कुडाळ यांनी सांगितले आहे . मोठ्या संख्येने भव्य आदात बैलगाडी शर्यतला उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा