Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

*अमेरिकेमध्ये बेकायदा राहणाऱ्या भारतीयांची मायदेशी रवानगी----* *लष्कराच्या विमानाचे भारताकडे उड्डाण...*


 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांविरुद्ध तीव्र कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना पुन्हा भारतात पाठवले जात आहे. अशा स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकेचे लष्करी विमान भारताकडे रवाना झाले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली असल्याचे वृत्त इंडिया टुडेने रॉयटर्सच्या हवाल्याने दिले आहे.


नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले की, सी-१७ विमान स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे. परंतु ते किमान २४ तासांपर्यंत पोहोचणार नाही.


ट्रम्प यांनी अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठ्या हद्दपारीचे आश्वासन दिले होते आणि यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने सुमारे १८,००० कागदपत्रे नसलेल्या भारतीय नागरिकांची प्रारंभिक यादी तयार केली आहे. दरम्यान अमेरिकेहून भारताच्या दिशेने निघालेल्या विमानात कितीजण आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा