Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

*स्वारगेट बस स्थानकातील खाजगी एजंट,तृतीयपंथी व अवैध रिक्षा पार्किंग बाबत स्वारगेट आकाराचे ,स्वारगेट पोलीस स्टेशनला निवेदन.*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

खाजगी ऐजेंट व तृतीय पंथीय यांचे आगारमध्ये येऊन प्रवाशी व रा.प. कर्मचाऱ्यांना करत असलेल्या दमदाटी आणि बस स्थानक परिसरात रिक्षा पार्किंग बाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वारगेट आगार पुणे विभाग यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या नियोजनाबाबत तक्रारी निवेदन दिले असून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी यांनी मित्रांनो द्वारे केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे


 रा.प.म. स्वारगेट आगारात कायमच प्रवाशांची गर्दी असते. पुर्ण महाराष्ट्रातून प्रवाशी चढ उतार होत असते. रोजचे किमान ४० ते ४५ हजार प्रवाश्यांची रोजची वर्दळ स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये असते. तरी सदर ठिकाणी खाजगी एजेंट हे बसस्थानक परिसरामध्ये येऊन, गाडीतून, रांगेतून प्रवाशी ओढून नेतात व त्यांना खाजगी गाडीतून प्रवास करण्यास उद्‌युक्त करतात. सदर बाब हि अत्यंत गंभीर व चुकीची आहे. सदर बाबतीत त्यांचेवर योग्य ती कडक कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार हे आपणास आहेत. तरी ह्याबाबत या अगोदरहि अनेकदा पत्रव्यवहार आलेला आहे. परंतु खेदजनक बाब अशी आहे की, अ‌द्यापर्यंत कोणतीही कारवाई अथवा यांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली नाही. तसेच सध्या आगारात तृतीयपंथी लोकांचा नाहक वर्दळ आणि दमदाटी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सदर लोक हि मद्यपान करून, अतिशय गलिच्छ आणि घाणेरडे पेहरावामध्ये आहोरात्र आगारामध्ये वावरत असतात. स्वारगेट आगार हे प्रवाश्यांच्या सोयीसाठी व प्रवाश्यांसाठी असलेले ठीकाण आहे. उगाच दमदाटी आणि लुटमार करण्यासाठीचे ठिकाण अजिबात नाही.


प्रवाशांची गर्दी आणि असाहय्यता पाहून सदर तृतीयपंथी लोक हे महिला, वृध्द प्रवाशी, लहान मुले यांना स्पर्श करून जबरदस्ती करून त्यांना वेठीस धरून त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. सदर बाब हि अत्यंत चुकीची आणि प्रवाशांची लुटमार आहे.


तरी सदर बाबतीत आपणाकडून सदर खाजगी एजंट आणि तृतीयपंथी यांचेवर कडक कारवाई होऊन त्यांना आगारात येण्सास पूर्णपणे मज्जाव आपणामार्फत करण्यात यावा. 


तसेच राज्य परिवहन महामंडळ स्वारगेट आगारात दररोज किमान अंदाजे१७०० बस गाड्यांची संचलन होत असते राज्य परिवहन स्वारगेट गावाचे इन गेट व आऊट गेट ला आहेत प्रकारे रिक्षा ह्या पार्किंग केलेल्या असतात सदर रिक्षा पार्किंग या आजाराच्या आवारात केले जाते जे की अतिशय नियम आहे आहे शिवाय सदर रिक्षाचालक हे प्रवाशांशी अतिशय उद्धट व उर्मट वर्तन करत असतात त्यांच्या अवैध पार्किंग राज्य परिवहन बस गाड्यांच्या संचलनासाठी पुरेशी जागा मिळत नाही आणि सदर गेट आणि इन गेट वर विनाकारण वाहतूक कोंडी होऊन त्याचा बाहेरील रस्त्यावर ताण येत आहे वरील सर्व प्रकारामुळे आगारात व बाहेरील रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे 

     

     *रिक्षा पार्किंग बाबत*




     तसेच सदर रिक्षा थांबत असलेल्या ठिकाणी हे परिवहन विभाग यांच्या नियमाविरुद्ध आहे तरी सदर बाबतीत आपणाला एक कडक कारवाई करून आगारातील रिक्षा ह्या पूर्णपणे हटवून खाजगी गाड्यांना अटकाव करण्यात यावा जेणेकरून कोणताही प्रकार घडणार नाही अबाधित राहील तरी या बाबतीत आपणाकडून सहकार्य मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे


सदर बाब आपल्या माहितीस्तव व पुढील कार्यवाहीसाठी सादर.


०१) मा. विभाग नियंत्रक

रा.प.म. पुणे विभाग


०२) विभागीय वाहतूक अधिकारी

रा.प.म. पुणे विभाग.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक/ स्वारगेट पोलीस स्टेशन स्वारगेट पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा